आता मुंबई-नांदेड प्रवास करा एका तासात!


SHARE

वीक-एण्डला मुंबईहूूून नांदेडचा प्रवास करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण हा प्रवास आता फक्त एका तासात करता येणार आहे. तेही अल्प दरात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी उडान योजनेंतर्गतची मुंबई-नांदेड-मुंबई ही बहुप्रतिक्षित विमानसेवा गुरुवारपासून सुरू होत आहे. ट्रुजेट या कंपनीकडून ही विमानसेवा दिली जाणार आहे.


स्वस्तात करा विमान प्रवास

मुंबई ते नांदेड हा प्रवास सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसेल असाच असणार आहे. या हवाई प्रवासाचे तिकीट दर २५०० ते ३००० रुपये असणार आहे.


या अभिनेत्यांनी केला पहिला प्रवास

ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर अभिनेते जितेंद्र, राकेश रोशन, शक्ती कपूर, आदित्य पांचोली यांनी पहिल्या विमानाने नांदेडचा प्रवास केला. यापूर्वी शिर्डी-मुंबई आणि शिर्डी-हैदराबाद ही विमानसेवा सुरू झाली होती.हेही वाचा

मुंबई ते शिर्डीचा प्रवास फक्त 40 मिनिटांत


संबंधित विषय
ताज्या बातम्या