Advertisement

नवी मुंबई लवकरच मुंबई, अलिबाग, वसई-विरारला जोडली जाणार

येत्या ६ महिन्यात नवी मुंबईत जलवाहतुकीस सुरुवात होणार आहे.

नवी मुंबई लवकरच मुंबई, अलिबाग, वसई-विरारला जोडली जाणार
SHARES

येत्या ६ महिन्यात नवी मुंबईत जलवाहतुकीस सुरुवात होणार आहे. यासाठी जलवाहतूक टर्मिनस उभारण्यात आले आहे. मुंबई, अलिबाग, ठाणे, उरण बरोबर कोकणालाही या जलवाहतुकीनं जोडलं जाणार आहे.

नवी मुंबई शहराला लागून खाडी किनारा असल्यानं याचा जलवाहतुकीसाठी उपयोग करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. यासाठी खाडीमध्ये भव्य असे जलवाहतूक टर्मिनस उभे करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात इथं रोरो सेवा बोट आणून ट्रायल केली जाणार आहे.

नेरूळ इथल्या खाडीत सिडको कडून ११० कोटी खर्च करून हे बोटींचे टर्मिनल उभारण्यात आले आहे. या ठिकाणावरून गेट वे ॲाफ इंडिया, भाऊचा धक्का, मांडवा, अलिबाग, ठाणे, उरण, वसई विरार आदी भागात रोरो सेवा सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे नवी मुंबईकरांना मुंबईत २० मिनिटात तर अलिबाग इथं एक तासाच्या आत पोहोचता येणार आहे.

बोटींमध्ये एकाच वेळेस ३०० प्रवासी प्रवास करू शकतात. तर ८० फोरव्हीलर तर ७५ टू व्हीलर जाऊ शकतात. सध्या या बोट टर्मिनलचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता फक्त बोटीपर्यंत जाण्यासाठी लागणारे फेंडर आणि स्टेअरकेसचे काम बाकी आहे. येत्या ३० ॲाक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे.

ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे यांनी या जलवाहतूक टर्मिनलची सिडको अधिकारी आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून पाहणी केली.

२०१८ मध्ये सुरू झालेल्या या कामास पर्यावरण विभाग केंद्र सरकार, मॅंग्रोज डिपार्टमेंन्ट यांच्या आडथळ्यामुळे १५ महिने वेळ वाया गेला. मात्र खासदार विचारे यांनी केंद्रात पाठपुरावा केल्यानं पर्यावरण विभागाकडून परवानग्या मिळण्यास मदत झाली.



हेही वाचा

ट्रान्सहार्बर मार्गावरील १६ वातानुकूलित ट्रेनचे वेळापत्रक जाहीर

रेल्वेनं कोविड मार्गदर्शक तत्त्वे ६ महिन्यांसाठी वाढवली

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा