Advertisement

रेल्वेनं कोविड मार्गदर्शक तत्त्वे ६ महिन्यांसाठी वाढवली

रेल्वे मंत्रालयानं गुरुवारी कोविड 19 (COVID-19) शी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे कायम ठेवली आहेत.

रेल्वेनं कोविड मार्गदर्शक तत्त्वे ६ महिन्यांसाठी वाढवली
SHARES

रेल्वे मंत्रालयानं गुरुवारी कोविड 19 (COVID-19) शी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे सहा महिन्यांसाठी किंवा पुढील निर्देशांपर्यंत वाढवली आहेत. अधिसूचनेत म्हटलं आहे की, रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये मास्क न घातल्यास ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

भारतीय रेल्वेनं सांगितलं की, प्रवाशांना विनंती केली जाते की प्रवास सुरू होण्यापूर्वी विविध राज्यांनी जारी केलेल्या आरोग्य सल्लागार मार्गदर्शक सूचनाचं पालन करणं गरजेचं आहे.

नवरात्रीला सुरुवात झाली आहे. सणांच्या काळात प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. अशा परिस्थितीत कोरोनाची प्रकरणं वाढू नयेत यासाठी रेल्वे उपाययोजना आखत आहे. यासाठीच १७ एप्रिल २०२१ पासून रेल्वेकडून ५०० रुपयांचा दंड लागू करण्यात आला. ज्याची मुदत ६ महिन्यांसाठी होती.

आता याला आणखी ६ महिन्यांची वाढ मिळाली आहे. आता १६ एप्रिल २०२२ पर्यंत हा नियम लागू राहलि. या संदर्भात रेल्वे मंत्रालयानं सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, सक्रिय प्रकरणं २ लाख ४४ हजार १९८ वर आलीत. जी २०४ दिवसांतील सर्वात कमी आहेत. तर ३१८ जणांच्या मृत्यूंसह मृतांची संख्या ४ लाख, ४९, ८५६ झाली.



हेही वाचा

ट्रान्सहार्बर मार्गावरील १६ वातानुकूलित ट्रेनचे वेळापत्रक जाहीर

महिला प्रवाशांसाठी 'बेस्ट'चं विशेष नियोजन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा