Advertisement

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे' गुरूवारी २ तासांसाठी बंद


मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे' गुरूवारी २ तासांसाठी बंद
SHARES

मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग गुरुवारी २ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ओव्हर हेड गॅण्ट्री बसवण्याच्या कामाकरीता या मार्गावरील वाहतूक २ तासांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.


किती वाजता होणार काम?

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)कडून गुरुवारी मुंबई पुणे मार्गावर ओव्हर हेड गॅण्ट्री बसवण्याच्या काम करण्यात येणार आहे. यासाठी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक बंद ठेणण्यात येणार आहे.



कुठल्या मार्गाने वाहतूक वळवणार

या वेळेत वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी शेडुंग फाटा येथून वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गावर वळविण्यात येणार आहे. मात्र, पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु राहणार आहे. त्यामुळं या मार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.



हेही वाचा-

१४ गणपती विशेष गाड्यांचा विस्तार; कोकण रेल्वेचा निर्णय

वारंवार मोनो का बंद पडते? एमएमआरडीए करणार चौकशी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा