Advertisement

१४ गणपती विशेष गाड्यांचा विस्तार; कोकण रेल्वेचा निर्णय

गणेशोत्सवासाठी दरवर्षी कोकण आणि मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातात. प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी विशेष फेऱ्यांची अंतिम तारीख आणखी वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे.

१४ गणपती विशेष गाड्यांचा विस्तार; कोकण रेल्वेचा निर्णय
SHARES

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेनं खुशखबर दिली आहे. कोकण रेल्वेनं १४ गणपती विशेष गाड्यांच्या फेऱ्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी मुंबईसह राज्यभरातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकण रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.  


सप्टेंबरअखेरपर्यंत गाड्या

गणेशोत्सवासाठी दरवर्षी कोकण आणि मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातात. यंदाही विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात आलं असून काही गाड्यांची घोषणासुद्धा करण्यात आली आहे. प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी विशेष फेऱ्यांची अंतिम तारीख आणखी वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे. या गाड्या सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या व चौथ्या आठवड्यापर्यंत धावणार आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसह-सावंतवाडी रोड गाडीसह पनवेल-सावंतवाडी या गाडीचाही समावेश आहे.


असा असेल विस्तार 

  • ट्रेन क्रमांक ०१४३३ आणि ०१४३४ -  पनवेल-सावंतवाडी-पनवेल  - ११ सप्टेंबरएेवजी १८ सप्टेंबरपर्यंत सुरू
  • ट्रेन ०१४३५ आणि ०१४३६ - सावंतवाडी-पनवेल-सावंतवाडी  - १२ सप्टेंबरएेवजी १९ सप्टेंबरपर्यंत सुरू
  • ट्रेन ०१४४८ -  सावंतवाडी रोड ते पनवेल  -  १५ सप्टेंबरपर्यंतएेवजी २२ सप्टेंबरपर्यंत धावणार
  • ट्रेन ०१०९५ आणि ०१०९६ - एलटीटी ते सावंतवाडी ते एलटीटी  -  ११ व १२ सप्टेंबरऐवजी अनुक्रमे १८ व १९ सप्टेंबपर्यंत धावणार
  •  ट्रेन ०१४३१ आणि ०१४३२, ०१४४७  - पुणे-सावंतवाडी-पुणे  - १७, २० आणि २१ सप्टेंबपर्यंत धावणार आहेत.



हेही वाचा-

वारंवार मोनो का बंद पडते? एमएमआरडीए करणार चौकशी

महिन्याभरात येणार मध्य रेल्वेचं 'रेल सुरक्षा' अॅप!




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा