Advertisement

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर दोन तास वाहतूक बंद

ओव्हरहेड गँट्रिज बसविण्याच्या कामासाठी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर दोन तास वाहतूक बंद
SHARES

मुंबई-पुणे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी त्रासदायक बातमी आहे. कारणं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक गुरुवारी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वे वरील रसायनी ते माडप दरम्यान ओव्हरहेड गँट्रिज बसविण्याच्या कामासाठी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच, पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक जुन्या महामार्गावरून वळवण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना दोन तास वाहतूक कोडीचा सामना करावा लागणार आहे.


गेल्या वर्षीही बंद

ओव्हरहेड गँट्रिज बसविण्याचे काम पुर्ण झाल्यानंतर दुपारी २ वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी एक्सप्रेस वे हा महत्वाचा मार्ग असल्यामुळं एक्स्प्रेस वेवरील ओव्हरहेड गँट्रिज बसवण्याचं काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, मागील वर्षी देखील ६ सप्टेंबर रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. खालापूर टोलनाक्याजवळ ओव्हरहेड गँट्रिज बसविण्याच्या कामासाठी पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात आली होती.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा