Advertisement

इंटरसिटी एक्स्प्रेसचा कर्जत थांबा रद्द, प्रवास झाला अडीच तासांचा

इंटरसिटी एक्सप्रेसच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला पुश-पूल पद्धतीचं इंजिन लावून शुक्रवारी ३१ मे ते गुरुवार ६ जूनपर्यंत चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबई ते पुणे प्रवाशांचा प्रवास हा ३५ ते ४० मिनिटं लवकर होणार आहे.

इंटरसिटी एक्स्प्रेसचा कर्जत थांबा रद्द, प्रवास झाला अडीच तासांचा
SHARES

मध्य रेल्वेच्या मुंबई ते पुणे या मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसनं प्रवाशांना २ तास ३५ मिनिटांत पुण्याला जाता येणार आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला पुश-पूल पद्धतीचं इंजिन लावून शुक्रवारी ३१ मे ते गुरुवार ६ जूनपर्यंत चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबई ते पुणे प्रवाशांचा प्रवास हा ३५ ते ४० मिनिटं लवकर होणार आहे. मात्र यासाठी कर्जत थांबा रद्द करण्यात आल्याने प्रवासी नाराज झाले आहेत.


एलएचबी डबे

इंटरसिटी एक्स्प्रेसला एलएचबी डबे अाहेत. त्यामुळे पुणे इंटरसिटीने मुंबई ते पुणे अंतर गाठण्यासाठी ३ तास १५ मिनिटं लागत होती. मात्र, आता २ तास ३५ मिनिटं लागणार आहे. त्याशिवाय, डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेसला देखील डबल इंजिन लावून ‘पुश-पूल’ तंत्रानं वेग वाढविण्याची मध्य रेल्वेची योजना आहे.


कर्जतचा थांबा रद्द

इंटरसिटी एक्स्प्रेसला कर्जत स्थानकात बँकर लावण्यासाठी थांबा दिला जात होता. परंतु, नव्या वेळापत्रकानुसार हा थांबा रद्द करण्यात आला आहे. मुंबई ते पुणे इंटरसिटी गाडी क्र. १२१२७ ही सकाळी ६.४० वाजता सीएसएमटीहून सुटून पुण्याला ९.५७ वाजता पोहोचत होती. मात्र, आता ही गाडी सकाळी ६.४५ वाजता सुटणार असून, पुण्याला ९.२० वाजता पोहोचणार आहे. तसंच, गाडी क्र. १२१२८ ही गाडी पुण्याहून संध्याकाळी ५.५५ वाजता सुटून सीएसएमटीला ९.०५ वाजता पोहोचत होती. मात्र, ही गाडी आता संध्याकाळी ६.३० वाजता सुटणार असून, सीएसएमटीला पूर्वीप्रमाणं रात्री ९.०५ वाजता पोहोचणार आहे.

कर्जत थांबा रद्द करण्याआधी मध्य रेल्वेने प्रवासी संघटनांचं मत विचारात घेतलेलं नाही. त्यामुळे या गाडीने कर्जत-सीएसटी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची थांबा रद्द झाल्याने गैरसोय होऊ शकते. असं म्हणत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.



हेही वाचा -

माेदी मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री, तर सीतारमण अर्थमंत्री

'करण ओबेरॉयवरील गुन्हा मागे घे', तक्रारदार महिलेला धमकी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा