Advertisement

जुना मुंबई-पुणे व एक्स्परेस वे वाहतुकीसाठी बंद


जुना मुंबई-पुणे व एक्स्परेस वे वाहतुकीसाठी बंद
SHARES

कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेता राज्य सरकारकडून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्यानं गर्दी होऊ नये यासाठी सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशातच आता, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेसह जुना मुंबई-पुणे मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या महामार्गावरून केवळ आत्यावश्यक सेवांनाच वाहतुक करता येणार आहे. परंतु, टोल नाक्यावर या आत्यावश्यक वाहनांची देखील तपासणी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. 

मुंबईतील नागरिकांनी शहराबाहेर जाऊ नये तसंच पुणे किंवा इतर ठिकाणच्या लोकांनी मुंबईत प्रवेश करु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खालापूर, कळंबोली, कामशेत या टोलनाक्यांवर पोलीस लोकांची ओळखपत्रं तपासत आहेत. मुंबई आणि पुण्यात सर्वात जास्त करोनाची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत.  

राज्य सरकारनं अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत. मात्र तरिही लोक आपली खाजगी वाहनं घेऊन घराबाहेर पडत आहेत. 



हेही वाचा - 

संचारबंदीचा गुढीपाडव्याच्या बाजाराला फटका

भाजीआवक बंद, भाजीपाला महागण्याची शक्यता



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा