Advertisement

बिहारमधील प्रवाशांसाठी मुंबईतून विशेष ट्रेन, 'असं' आहे वेळापत्रक

भारतीय रेल्वेनं (Indian Rail) मुंबई आणि पुणे इथून स्पेशल ट्रेन (Special Trains) सोडण्यास सुरुवात केली आहे.

बिहारमधील प्रवाशांसाठी मुंबईतून विशेष ट्रेन, 'असं' आहे वेळापत्रक
SHARES

कोरोनाचा (Coronavirus mumbai) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मुंबईत देखील कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनक आहे. मुंबईत वास्तव्य करणारे बिहारमधील लोक आता यामुळे पुन्हा आपल्या मूळगावी परतण्याच्या तयारीला लागले आहेत.

याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेनं (Indian Rail) मुंबई आणि पुणे इथून स्पेशल ट्रेन (Special Trains) सोडण्यास सुरुवात केली आहे.

प्रवाशांच्या सोयीकरिता भारतीय रेल्वेनं मुंबई ते पाटणा (Patna) आणि दरभंगा (Darbhanga) तसंच पुणे ते दानापूर (Danapur) या मार्गावर जादा स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रवाश्यांनी आगाऊ आरक्षण घेतलं आहे, अशाच प्रवाश्यांना या ट्रेन्सनं प्रवास करता येणार आहे.

१) ०१४०१ : सुपरफास्ट विशेष ट्रेन पुण्याहून ९, ११, १६ एप्रिल आणि १८ एप्रिलला दुपारी ४.१५ वाजता सुटेल. ही ट्रेन दानापूरला दुसऱ्या दिवशीरात्री ११.४५ वाजता पोहोचेल

२) ०१४०२ : विशेष ट्रेन दानापुरहून ११,१३,१८ एप्रिल आणि २० एप्रिलला दुपारी ०४.०० वाजता सुटेल. ही ट्रेन पुण्यात दुसऱ्या दिवशी दुपारी १२.०५ वाजता पोहोचेल.

३) ०१०९१ : सुपरफास्ट ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई इथून १२, १५ एप्रिल आणि 19 एप्रिलला सकाळी ११.०५ वाजता सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता पाटण्याला पोहोचेल.

४) ०१०९२ : विशेष ट्रेन पाटण्याहून १३, १६ आणि २० एप्रिलला दुपारी ४.२० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.

५) ०१०९७ : सुपरफास्ट विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई इथून १२ आणि १९ एप्रिलला सकाळी ०८.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४.१० वाजता दरभंगा इथं पोहचेल.

६) ०१०९८ : सुपरफास्ट विशेष ट्रेन दरभंगा इथून १३ आणि २० एप्रिलला संध्याकाळी ५.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ५.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबईला पोहोचेल.

मोठ्या प्रमाणात लोक महाराष्ट्रातून बिहारला जात आहेत. या अनुषंगानं बिहार राज्य सरकारनं तयारी सुरू केली आहे. मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी डीएम आणि एसपींसोबत बैठक घेत प्रत्येक विभागात क्वारंटाईन सेंटर्स (Quarantine Centers) सुरू करण्याच्या सूचना दिल्या.हेही वाचा

'वर्क फ्रॉम होम'मुळं मेट्रो १ च्या फेऱ्यांमध्ये होणार घट

लोकलमध्ये विनामास्क प्रवास केल्यास ५०० रुपयांचा दंड

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा