Advertisement

रुळांवर पाणी साचलं; मध्य, हॉर्बर मार्गावरील लोकल सेवा खंडीत

मुंबईत सोमवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस अद्यापही सुरूच आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला आहे.

रुळांवर पाणी साचलं; मध्य, हॉर्बर मार्गावरील लोकल सेवा खंडीत
SHARES

मुंबईत (mumbai) पहाटेपासूनच मुसळधार पाऊस (mumbai rains) सुरू आहे. याशिवाय ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोळसत आहे. पहिल्याच पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भऱलं आहे. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसंच रेल्वे रुळावरही (railway track) पाणी आलं आहे. त्यामुळे मध्य (Central) आणि हार्बर (Harbor) लाईनवरील लोकल सेवा  (local service)  थांबवण्यात आली आहे.

सेंट्रल रेल्वेकडून यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. ट्विटमध्ये म्हटलं की, कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ९ वाजून ५० मिनिटांनी सीएसएमटी - कुर्लादरम्यानची सकाळी ९.५० पासूनची लोकलसेवा रद्द करण्यात आली आहे. तर सीएसएमटी - मानखुर्द हार्बर लाईनवरची सेवा सकाळी ११.१० पासून बंद करण्यात आली आहे. ट्रान्स हार्बर आणि BSU सेवा मात्र सुरळीत सुरु आहेत. ठाणे आणि कर्जत-कसारा तसंच मानखुर्द- पनवेल दरम्यानची शटल सेवाही सुरु आहे. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं सांगितलं आहे.

पुढील चार दिवस मुंबईत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत सोमवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस अद्यापही सुरूच आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.




हेही वाचा -

ब्लॅक फंगसच्या भितीपोटी नागरिकांची झाडांवर कुऱ्हाड, अफवा पसरवू नका

मास्कविना फिरणाऱ्या ३,४३४ जणांवर कारवाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा