Advertisement

लोकलचे प्रवासी झाले 'अॅप'सॅव्ही, मोबाईलवर दिवसाला १० हजार बुकिंग

मोबाइल अॅपची लोकप्रियता हळूहळू वाढत चालली आहे. मध्य रेल्वेवर डिसेंबर २०१७ मध्ये मोबाइल अॅपवरुन तिकीट घेणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या ४५ हजारांवर पोहोचली असून तिकीट विक्रीची सरासरी १० हजारांवर गेली आहे.

लोकलचे प्रवासी झाले 'अॅप'सॅव्ही, मोबाईलवर दिवसाला १० हजार बुकिंग
SHARES

तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांच्या रांगा कमी व्हाव्यात, म्हणून मध्य रेल्वेने युटीएस मोबाईल तिकीट अॅपची सुरूवात केली. या अॅपला आत्तापर्यंत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून दरदिवशी या अॅपवरुन वेगवेगळ्या स्थानकांच्या सरासरी १൦ हजार तिकिटांचं बुकिंग करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

सुरुवातीला या अॅपला कमी प्रतिसाद मिळाला असला, तरीही मोबाइल अॅपची लोकप्रियता हळूहळू वाढत चालली आहे. मध्य रेल्वेवर डिसेंबर २०१७ मध्ये मोबाइल अॅपवरुन तिकीट घेणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या ४५ हजारांवर पोहोचली असून तिकीट विक्रीची सरासरी १० हजारांवर गेली आहे.


काय सांगते आकडेवारी?

० मोबाईलवरून तिकीट घेणाऱ्यांची संख्या एप्रिलमध्ये ३८५१
० डिसेंबरमध्ये यात तीनपट वाढ, आकडा ९ हजारांहून अधिक
० प्रवासी संख्या एप्रिलमध्ये होती २४ हजार
० डिसेंबरमध्ये दुपटीने वाढून हीच संख्या पोहोचली ४५७११वर

डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून मोबाइल अॅपवरील दैनंदिन प्रवाशांची संख्या १० हजारांवर गेली आहे.


अॅपसाठी अनेक मोहिमा

मोबाइल अॅप प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या स्थानकांवर विशेष मोहीम घेण्यात येत आहे. ठाणे, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, खांदेश्वर, बदलापूर, सानपाडा आदी स्थानकांवर यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रवाशांना सादरीकरण केलं जात आहे. त्यातून प्रवाशांच्या शंका दूर करून हे अॅप वापरण्याविषयी जनजागृती करण्याचेही प्रयत्न केले जात आहेत.



हेही वाचा

पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेवरही मोबाईल तिकीट व्हेंडिंग ‘कियोस्क’ मशिन


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा