Advertisement

मुंबई विमानतळ ते ठाण्यापर्यंत बेस्टची प्रिमियम बससेवा होणार सुरू

आजपासून प्रवाशांच्या सेवेत ही सेवा येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

मुंबई विमानतळ ते ठाण्यापर्यंत बेस्टची प्रिमियम बससेवा होणार सुरू
SHARES

मोबाइल ॲपआधारित आसन आरक्षित करणारी बेस्टची प्रिमियम बससेवा मुंबई विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन अशी सुरू करण्यात आली आहे. आजपासून प्रवाशांच्या सेवेत ही सेवा येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

माता रमाबाई आंबेडकर चौक किंवा मरोळ नाका, डॉ. दत्ता सामंत चौक, चांदिवली जंक्शन, तुंगा व्हिलेज, डॉ. आंबेडकर उद्यान पवई, पंचकुटीर, आयआयटी मार्केट, टागोरनगर, जंक्शन, कांजूरमार्ग व्हिलेज, भांडुप व्हिलेज, भांडुप पम्पिंग सेंटर, मिठागर, मॅरेथॉन चौक तीन हात नाका, लुईसवाडी, कॅडबरी जंक्शन ठाणे गर्दीच्या वेळी बेस्ट बसगाड्यांना असलेली गर्दी, वेळेत उपलब्ध न होणारी बेस्ट बस पाहता बेस्ट उपक्रमाने मोबाइल ॲप आधारित आरक्षित होणारी वातानुकूलित विजेवर धावणारी प्रीमियम बससेवा १२ डिसेंबरपासून ठाणे ते वांद्रे कुर्ला संकुल आणि वांद्रे कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक दरम्यान सुरू केली.

सध्या एकूण २६ प्रिमीयम बसेस चालविण्यात येत आहेत. प्रीमियम बसगाड्यांची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.

ठाण्यातून वाहतूक होणाऱ्या प्रीमियम बसगाड्या

क्रमांक - मार्ग

एस-१०१- ठाणे-बीकेसी

एस-१०२- बांद्रा स्टेशन-बीकेसी

एस-१०४- एअरपोर्ट ते कफ परेड

एस-१०७- ठाणे ते पवई



हेही वाचा

mumbai"="" target="_blank">Mumbai local news: मुंबईत लोकलच्या डब्यात आढळला मृतदेह">Mumbai Local News: मुंबईत लोकलच्या डब्यात आढळला मृतदेह

सीएसएमटी-उरण रेल्वे मार्ग महिन्याच्या अखेरीस सुरू होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा