Advertisement

रेल्वे रुळाला तडा गेल्यानं हार्बर रेल्वे विस्कळीत

सोमवारी सकाळच्या सुमारास कुर्ला-टिळकनगर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आहे. त्यामुळं पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी वाहतूक उशीरानं धावत आहे.

रेल्वे रुळाला तडा गेल्यानं हार्बर रेल्वे विस्कळीत
SHARES

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळं लाखो मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला-टिळकनगर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक उशीरानं सुरू आहे


चाकरमान्यांचे हाल

सोमवारी सकाळच्या सुमारास कुर्ला-टिळकनगर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आहे. त्यामुळं पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी वाहतूक उशीरानं धावत आहे. तसंच सकाळी गर्दीच्या वेळेस रुळाला तडा गेल्यानं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेट मार्कचा सामना करावा लागत आहे.


वारंवार हार्बर विस्कळीत

दरम्यान नवं वर्षाच्या पहिल्याच म्हणजे जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेची वाहतूक चार वेळा विस्कळीत झाली आहे. २ जानेवारी रोजी सायन स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर, आसनगाव-आटगाव दरम्यान मालगाडीच्या इंजीनात बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. तसंच ५ जानेवारी रोजी अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मालगाडीच्या इंजीनात बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर सोमवारी १४ जानेवारी रोजी कुर्ला-टिळकनगर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा