Advertisement

लोकल प्रवासासाठी सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय 'हा' त्रास

मुंबईतील रुग्णसंख्या पाहता मुंबईचा पाहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. मात्र अद्याप मुंबईत नियम हे तिसऱ्या टप्प्याप्रमाणेच लावण्यात आले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांचा लोकल प्रवास थांबला आहे.

लोकल प्रवासासाठी सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय 'हा' त्रास
SHARES

मुंबईत कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव कमी होत असला तरी अद्याप निर्बंध हटवण्यात आलेले नाहीत. मुंबईतील रुग्णसंख्या पाहता मुंबईचा पाहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. मात्र अद्याप मुंबईत नियम हे तिसऱ्या टप्प्याप्रमाणेच लावण्यात आले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांचा लोकल प्रवास थांबला आहे. कामावर जाण्यासाठी खासगी वाहतुकीचा प्रवास करावा लागत असून, हा प्रवास खर्चिक ठरत असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळं संतप्त नागरिकांनी आम्हाला वेठीस धरू नये, तत्काळ लोकल सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

कोरोना (covid 19) काळात सरकारी उत्पन्न वाढवण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर भरमसाठ कर लावण्यात आला आहे. इंधन विक्री होण्यासाठी पहिल्या गटात आलेल्या मुंबईला तिसऱ्या गटाचे निर्बंध कायम ठेवल्याने सर्वसामान्यांवरील लोकलबंदी जैसे थे आहे. राजकीय उद्घाटने, बैठका गर्दीत पार पडतात. मग सर्वसामान्यांच्या स्वस्त प्रवासाचे साधन असलेली मुंबई लोकल सुरू करताना गर्दीचे निकष का लावण्यात येतात? संपूर्ण राज्यात गटनिहाय निर्बंधांनुसार शिथिलीकरण सुरू झाले. मग मुंबई लोकलबाबत वेगळी वागणूक का? खरंच गर्दीची भीती आहे की आणखी कोणती भीती आहे? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मुंबई लोकल सुरू झाल्याशिवाय दैनंदिन व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकत नाही, हे माहीत असूनही लोकल बंदी कायम ठेवणे हे राजकीय षडयंत्र असल्याचे रेल्वे प्रवासी महासंघाचे म्हणणे आहे. सर्वांत श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई पालिकेसह अन्य महापालिकेच्या निवडणुका दृष्टिपथात आहेत. गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या करोनाकाळामुळे शेकडो कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. तेल कंपन्यांकडून आगामी निवडणुकांसाठी पक्ष निधी मिळावा यासाठी हे सुरू आहे की काय, अशी शंकाही प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.

कार्यालये-आस्थापना सुरू झाल्या, मात्र नोकरदार वर्गाला कामावर पोहोचण्यासाठी स्वस्त वाहतूक व्यवस्था उपलब्ध झालेली नाही. ही स्थिती कायम राहिल्यास समाजात मोठी अस्वस्थता निर्माण होईल. स्वस्त आणि वेगवान प्रवासाचा मार्ग तातडीने खुला करावा, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

एसी लोकलसाठी रेल्वे मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मध्य, पश्चिम रेल्वेने प्रवासी सर्वेक्षण सुरू केले आहे. वातानुकूलित लोकल लोकप्रिय करण्यासाठी नऊ साधे आणि तीन वातानुकूलित डबे हाच फॉर्म्युला योग्य आहे. प्रथम दर्जा वातानुकुलित म्हणून चालवावा.हेही वाचा -

३० ते ४४ वयोगटाचं मोफत लसीकरण

बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवास करत असाल तर सावधान!

Read this story in English
संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा