रेल्वे स्थानकांवर बसवणार 70 लिफ्ट

 Mumbai
रेल्वे स्थानकांवर बसवणार 70 लिफ्ट

मुबंई - रेल्वे प्रशासान आता प्रगतीच्या वाटेवर आहे. सरकत्या जिन्यांपाठोपाठ आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, गरोदर महिलांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर 70 लिफ्ट बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

या वर्षात रेल्वे स्थानकांवर लिफ्ट बसवण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 3 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात, मध्य रेल्वेसाठी 1 कोटी 85 लाख तर पश्चिम रेल्वेसाठी 1 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मध्य रेल्वेच्या स्थानकांवर 40 तर पश्चिम रेल्वे स्थानकांवर 30 लिफ्ट बसवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Loading Comments