Advertisement

पनवेल ते वसई रोड नवीन रेल्वे मार्गिका होणार

बोरीवलीच्या एका टोकाला आणि वसईच्या एका टोकाला अशा दोन्ही बाजूला दुतर्फा ही लाइन असेल. 69.23 किमीची ही उपनगरीय रेल्वे लाइन महत्त्वाची ठरेल.

पनवेल ते वसई रोड नवीन रेल्वे मार्गिका होणार
SHARES

मुंबईतील (mumbai) वाढत्या लोकसंख्येसह लोकल ट्रेन (local train) मात्र त्या प्रमाणात वाढवण्यात आल्या नाहीत. वसई-विरार, कर्जत-खोपोली या मार्गावर लोकल ट्रेनची संख्या अतिशय कमी असल्याने चाकरमान्यांना मोठ्या गर्दीतून प्रवास करावा लागतो.

अशात आता लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता पनवेल-बोरिवली-वसई या उपनगरीय कॉरिडोरसाठी (coridor) हिरवा कंदील मिळाला आहे.

नवी मुंबईतून पनवेल स्थानकाला बोरीवली आणि वसई मार्गाने विरारपर्यंत जोडणारी लाइन निर्माण करण्यात येणार आहे. या मार्गासाठी मागील अनेक वर्षांपासून मागणी होत होती. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर हा मार्ग लवकरच तयार होणार आहे.

पनवेल-बोरिवली-वसई कॉरिडोरसाठी 12710.82 कोटींचा खर्च येणार आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी - III B) या अंतर्गत ही लोकल लाइन तयार होणार आहे.

पनवेल-बोरिवली-वसई या मार्गाचा उद्देश पूर्व आणि पश्चिम कनेक्टिव्हिटी करुन लोकल ट्रेनला (local train) होणारी गर्दी काही प्रमाणात कमी करणं असा आहे.

बोरीवलीच्या एका टोकाला आणि वसईच्या एका टोकाला अशा दोन्ही बाजूला हा दुतर्फा लाइन असेल. 69.23 किमीची ही उपनगरीय रेल्वे लाइन महत्त्वाची ठरेल.

सध्याच्या पनवेल-दिवा-वसई मार्गाप्रमाणे हा नवा मार्ग, नवा कॉरिडोर पनवेल-कर्जत मार्गाप्रमाणे स्वतंत्र्यपणे चालेल. यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारुन प्रवाशांना गर्दी कमी होण्यास मदत होईल.

एमयूटीपी - III B अंतर्गत बदलापूर आणि कर्जत दरम्यान तिसरी लाइन आणि आसनगाव आणि कसारा दरम्यान चौथी लाइन यासाठीही काम सुरू आहे. या संपूर्ण मार्गांसाठी एकूण 14907.47 कोटी रुपये खर्च येणार आहे.

वसई (vasai road) - पनवेल हा उपनगरीय कॉरिडोर पश्चिम उपनगरीय प्रवाशांना पनवेलहून गोवा आणि पुण्याला जाण्यासाठीही फायदेशीर ठरेल, तसंच भिवंडीतील पॉवरलूम उद्योगातील कामगारांसाठी देखील उपयुक्त ठरेल, अशी माहिती पश्चिम रेल्वे मुंबई विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, राजीव सिंघल यांनी सांगितलं.

हा मार्ग लांबच्या प्रवाशांना आणि औद्योगिक क्षेत्रासाठीही फायद्याचा ठरणार आहे.



हेही वाचा

MSRDCचा कारभार दादरमधील कोहिनूर स्क्वेअरमधून होणार

विसर्जनासाठी विहिरींमधून पाणी उपसून कृत्रिम तलाव भरले?

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा