Advertisement

MSRDCचा कारभार दादरमधील कोहिनूर स्क्वेअरमधून होणार

वांद्रे रेक्लमेशन येथील मुख्यालय लवकरच रिकामे करणार

MSRDCचा कारभार दादरमधील कोहिनूर स्क्वेअरमधून होणार
SHARES

वांद्रे-वरळी सागरी सेतूलगतच्या वांद्रे रेक्लमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) मुख्यालयासह कास्टींग यार्डच्या अंदाजे 29 जागेचा पुनर्विकास अदानी समुहाच्या माध्यमातून केला जाणार आहे. या कामासाठी लवकरच एमएसआरडीसीचे मुख्यालय रिकामे करण्यात येणार आहे.

मुख्यालयाचा पुनर्विकास होऊन नवीन इमारत पूर्ण होईपर्यंत एमएसआरडीसी भाडेतत्वावरील जागेतून कारभार चालविणार आहे. त्यानुसार एमएसआरडीसीकडून दादरमधील कोहिनूर स्क्वेअर इमारतीतील जागा निश्चित करण्यात आली आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला एमएसआरडीसीचे मुख्यालय कोहिनूर स्केअरमध्ये हलविले जाणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे एमएसआरडीसीचा कारभार कोहिनूर स्क्वेअरमधून चालणार आहे.

एमएसआरडीसीकडून राज्यभर 4000 किमीहून अधिकच्या रस्त्यांचे जाळे विणले जात असून यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. ही गरज भागवण्यासाठी एमएसआरडीसीने आपल्या मालकीच्या भूखंडांचा विकास करून त्यातून निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वांद्रे पश्चिम येथील एमएसआरडीसीच्या मुख्यालयासह येथील कास्टींग यार्डच्या एकूण 29 एकर जागेचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

यासाठीच्या निविदेत अदानी समुहाने बाजी मारली आहे. दरम्यान या पुनर्विकासाला आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नव्हते. पण आता मात्र प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने जनहित याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्याच्या तयारीला वेग आला आहे. त्याचाच भाग म्हणून आता एमएसआरडीसीचे मुख्यालय भाडेतत्वावरील जागेत हलविण्याची तयारी सुरु झाली आहे.



हेही वाचा

15 सप्टेंबरपासून नवीन UPI नियम लागू होणार

वैनगंगा-नलगंगा नदीजोड प्रकल्पाचा खर्च 98,000 कोटी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा