Advertisement

वाहन चालकांनो काळजी नको, आता गाडी टो होण्यापूर्वी मिळणार सूचना!


वाहन चालकांनो काळजी नको, आता गाडी टो होण्यापूर्वी मिळणार सूचना!
SHARES

जर तुम्ही चुकून नो पार्किंगमध्ये गाडी उभी केली असाल तर आता तुमची गाडी तुम्हाला माहीत पडल्याशिवाय टो होणार नाही. कारण आता वाहन टो करण्याबाबत नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. आता तुमची गाडी टो होण्यापूर्वी त्याची सूचना तुम्हाला दिली जाईल. म्हणजेच गाडी टो करण्यापूर्वी अनाउन्समेंट करण्यात येईल. त्याच बरोबर गाडीत कोणी बसले असल्यास वाहन टो केले जाणार नाही. असे आदेश मुंबई वाहतूक सह पोलीस आयुक्तांनी काढले आहे.


यामुळे नियमावली तयार केली

काही दिवसांपूर्वी मालाड येथे नो पार्किंगमध्ये असलेली गाडी वाहतूक पोलिसांनी टो केली. मात्र त्यावेळी तिथे कार चलाकाने वाहतूक पोलीसाशी हुज्जत घातली होती. त्यानंतर चालकासोबत असलेली त्याची पत्नी ही गाडीतच बसून राहिली. तिने गाडीतून उतरण्यास नकार दिला होता. शेवटी महिलेसोबतच गाडी टो करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाडी टो करून नेली जात असताना महिलेने बाळाला दूध पाजत असल्याचा कंगावा केला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई वाहतूक पोलिसांवर टिकेची झोड उठली होती. त्यामुळे वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित देखील करण्यात आले होते. दरम्यान या घटनेचे इतर व्हिडिओ समोर आल्यानंतर महिलेने गाडीतून उतरण्यास नकार दिल्याचा आणि गाडीत मुलाला घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खरी परिस्थिति समोर आली होती. त्यानंतर आता वाहन टो करताना एक नियमावलीच सह पोलीस आयुक्तांनी काढली आहे.


या नियमावलीत काय?

• टोइंग वहानावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्ज्याच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी

• नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांच्या आत वाहन चालक, मालक किंवा इतर कोणतीही व्यक्ती असल्यास ते वाहन टो करण्यात येऊ नये

• टोइंग वाहनांवरील कर्मचाऱ्याकडे ई चलना मशीन आणि वॉकी टॉकी देण्यात यावे

• टोइंगची करवाई सुरू करण्यापूर्वी मेगाफोनद्वारे आवाहन करण्यात यावे, कोणी न आल्यास पुढील करवाई करण्यात यावी

• टो करण्यात आलेले वाहन चौकीला नेत असताना मध्येच वाहन चालक किंवा मालक तिथे आल्यास आणि तो ई-चलान द्वारे दंड भरण्यास तयार असल्यास दंड स्वीकारून वाहन तिथेच सोडण्यात यावे

• नो पार्किंगमधील वाहन टो करण्यापूर्वी किंवा टोईंगची कार्यपद्धती पूर्ण होण्यापूर्वी (टोइंग व्हॅनवरील चारही क्लॅप चारही चाकांना लावण्यापूर्वी) कार चालक तिथे आल्यास फक्त नो पार्किंगचा दंड आकारण्यात यावा, टोइंग चार्जेस घेऊ नयेत.

• टोइंग वाहनांवरील खासगी कर्मचाऱ्यांनी वाहन चालक आणि इतरांशी उद्धट वर्तन करू नये


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा