पुढील स्थानक प्रभादेवी !

Mumbai
पुढील स्थानक प्रभादेवी !
पुढील स्थानक प्रभादेवी !
See all
मुंबई  -  

पुढील स्थानक प्रभादेवी ! अशी उद्घोषणा पश्चिम उपनगरीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या कानावर लवकरच पडणार आहे. कारण एल्फिन्स्टन रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी’ आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस’चे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्यास आता केंद्र सरकारनेही हिरवा कंदील दाखवला आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने या ठरावाला एकमताने मंजुरी दिली होती. त्यापाठोपाठ आता केंद्र सरकारनेही या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने ही दोन्ही स्थानकं नवीन नाव धारण करणार आहेत. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाला प्रभादेवी नाव देण्याची मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सर्वप्रथम १९९१ साली केली होती.

यापूर्वी ओशिवरा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून राम मंदिर नाव देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार राज पुरोहित यांनी मरिन लाइन्स स्थानकाचे नाव बदलून मुंबादेवी करण्याची मागणी केली होती. नव्या सरकाराने स्थानकांची नावं बदलण्याचा जणूकाही धडाकाच लावला आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्यात यावे म्हणून काही संघटनांनी मुंबई सेंट्रल स्थानकाबाहेर मूक मोर्चाही काढला होता. शिवसेनेचे खासदार अरविंद सांवत यांनीही सात रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाही पत्र लिहिले होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.