SHARE

राम मंदिर- ओशिवरा स्थानकाचं नाव राम मंदिर असे केल्यानंतर राम मंदिर स्थानकाचे उद्घाटन चर्चेचा विषय बनला होता. मात्र आता 22 डिसेंबरला राम मंदिर स्थानकाच्या उद्घाटनाचा दिवस निश्चित करण्यात आलाय. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते स्थानकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळं श्रेय घेण्यासाठी या स्थानकाची पाहणी पहिल्यांदा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. त्यानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही राम मंदिर स्थानकाची पाहणी केली होती. आता स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या मुलाकडून या कार्यक्रमाबद्दलची माहिती पाठवली जात आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांची नावं वगळण्यात आलीत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या