Advertisement

Coronavirus Updates: सामाजिक अंतराविनाच बेस्ट प्रवास

अत्यावश्यक सेवा असलेल्या सार्वजनिक परिवहन सेवांमधील प्रवासात सामाजिक अंतर ठेवण्याचं बंधनकारक असतानाही त्यामध्ये अंतर ठेवलं जातं नाही आहे.

Coronavirus Updates: सामाजिक अंतराविनाच बेस्ट प्रवास
SHARES

मुंबईत लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. परंतु, अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू असून, यामध्ये एसटी व बेस्ट बसचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गजन्य असल्यामुळं नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकार अगोदरचं केलं आहे. त्याचप्रमाणं या अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीला ही काही निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु, बेस्ट प्रशासनाकडून त्याचं पालन न केल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. अत्यावश्यक सेवा असलेल्या सार्वजनिक परिवहन सेवांमधील प्रवासात सामाजिक अंतर ठेवण्याचं बंधनकारक असतानाही त्यामध्ये अंतर ठेवलं जातं नाही आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट उपक्रमाकडून सुरू असलेल्या बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे कोरोना फैलावाचा धोका कायम आहे. बसमधील गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी बेस्ट उपक्रमानं अद्याप कोणताही तोडगा काढलेला नाही. तर सामाजिक अंतराच्या पालनाचा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनादेखील विसरच पडलेला दिसतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू केल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील १६ मार्गाव्यतिरिक्त डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार मुंबईतून थेट पनवेल, कल्याण, बदलापूर, वसई-विरारसाठीही बेस्ट बसची विशेष सुविधा आहे. याशिवाय मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजेच पालघर, पनवेल, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानक हद्दीतून मुंबईतील बोरीवली, वाशी, दादर, ठाणे (खोपट)पर्यंत एसटी असून तेथून पुढे बेस्ट बसद्वारे शहरांतर्गत वाहतूक होत आहे.

बसमधून प्रवास करताना उभ्याने प्रवास करण्यास शासनानं मनाई केली आहे. मात्र, गर्दीमुळं बसण्यासाठी जागा नसल्यानं कर्मचाऱ्यांना उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळं बेस्ट बसमध्ये अनेक जण एकमेकांना खेटून उभे असतात. तर कर्मचारी आसनांवरही बाजूबाजूलाच बसतात. सामाजिक अंतराचे पालन करण्यावरून प्रवासादरम्यान काही कर्मचाऱ्यांमध्येही वाद होत आहेत.



हेही वाचा -

मुंबईतील भाटिया रुग्णालयही सील

राज्यात ७ दिवसांत 'इतकं' क्विंटल धान्याचं वाटप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा