Advertisement

Amazon वर 'असं' बुक करा रेल्वे तिकिट

ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन इंडियानं (Amazon India) रेल्वेबरोबर त्यांची भागीदारी बुधवारी जाहीर केली.

Amazon वर 'असं' बुक करा रेल्वे तिकिट
SHARES

ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन इंडियानं (Amazon India) रेल्वेबरोबर त्यांची भागीदारी बुधवारी जाहीर केली. प्रवास आणि जेवणाच्या सुविधांमध्ये ही भागीदारी असेल. त्यामुळे अ‍ॅमेझॉनच्या वेबासाइटवरून प्रवाशांना आता रेल्वे तिकिटं बुक करता येणार आहेत.

तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर आता सर्व रेल्वे गाड्यांची उपलब्धता, राखीव सीटची माहिती घेता येणार आहे. शिवाय तुम्ही अ‍ॅमेझॉन वॉलेटमध्ये जर पैसे टाकले तर एका क्लिकवर तुम्हाला तिकिटाचे पैसे भरणं सोपं होणार आहे. पहिल्या तिकिटावर कॅशबॅकची संधी असेल. या भागीदारीमुळे प्रवाशांना अ‍ॅमेझॉनवरून त्यांचं तिकीट डाउनलोड करता येईल. शिवाय प्रवास रद्द झाल्यास तिकीट रद्द करणंही सोपं होणार आहे.

अ‍ॅमेझॉन इंडियाच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना त्यांच्या पहिल्या तिकीट बुकिंगवर १० टक्क्यांपर्यंत तर प्राईम मेम्बरला १२ टक्क्यांप्रर्यंत कॅशबॅकची सुविधा असेल. मर्यादित कालावधीसाठी ही योजना असणार आहे. शिवाय काही कालावधीसाठी ट्रान्झॅक्शन चार्जेस वगळले आहेत. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपवर ही सुविधा आता उपलब्ध करून दिली आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड, आयओएस युजर्सना डाऊनलोड करता येणार आहे.

गेल्या वर्षी अ‍ॅमेझॉनननं विमान आणि बस सेवेची तिकीटं बुकिंग सुविधा उपलब्ध करून दिली होती. आता IRCTC सोबत भागीदारी झाल्यानं आम्ही खूप उत्सुक आहोत, असं अ‍ॅमेझॉन पे चे संचालक विकास बन्सल यांनी म्हटलं आहे.

तिकिट बुक करताना अ‍ॅमेझॉन पे अ‍ॅपवर गाड्या, श्रेणीं, प्रवासाची तारीख, त्यांचं प्रवासाचं ठिकाण द्यावं लागेल. त्यानंतर अ‍ॅपवर त्यांना गाड्यांच्या उपलब्धतेची माहिती दिली जाईल. शिवाय गाड्यांची यादी या ठिकाणी ग्राहक पाहू शकतील. तिकिट रद्द करण्यासाठी युजर्सना ‘युअर ऑर्डर’ वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्याचप्रमाणे फोन आणि चॅटद्वारे, हेल्पलाइनद्वारे २४ तास मदत उपलब्ध असेल.



हेही वाचा

मुंबई लोकलबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सुचना

रेल्वे अपघात टाळण्यासाठी रुळांजवळील 'इतक्या' अतिक्रमणांवर हातोडा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा