Advertisement

आता मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा डबा

2014 मध्ये, खंडपीठाने ज्येष्ठांच्या लोकल प्रवासाबाबत जनहित याचिकेवर सुनावणी घेतली होती.

आता मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा डबा
SHARES

गर्दीच्यावेळी ज्येष्ठ नागरिकांना लोकलचा प्रवास अशक्य असतो. ज्येष्ठ नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन सध्याच्या मालडब्यातील आसन रचनेमध्ये बदल करत वाढीव आसने देण्याची तयारी रेल्वेने पूर्ण केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ नागरिकांसंबंधी जनहित याचिकेवर उत्तर देताना लोकलमधील मालडबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन असल्याचे प्रतिज्ञापत्र मध्य रेल्वेने सादर केले असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

लोकलच्या सामान्य डब्यात ज्येष्ठांसाठी राखीव आसने आहेत. मात्र गर्दीच्यावेळी राखीव आसनांवरून तरुणांना जागा रिकामी करण्यास सांगणे म्हणजे वादाचे कारण ठरते.

लोकलच्या मालडब्यांची व्यवस्था स्वतंत्र आहे. यामुळे हा उपाय ज्येष्ठांसाठी लाभदायक ठरू शकेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

रेल्वेच्या 12 डब्यांच्या लोकलमध्ये 88 आसनांसह 4 प्रथम श्रेणीचे डबे असतात. 39 आसनांचे तीन महिला डबे, दिव्यांग प्रवाशांसाठी 38 आसनांचे दोन डबे आणि उर्वरित डबे सर्वसामान्यांसाठी राखीव असतात.

12 डब्यांच्या लोकलमधून गर्दीच्या वेळी साडेचार ते पाच हजार प्रवासी प्रवास करतात. यावेळी मालडब्यातील प्रवासी भारमान एक टक्कयांहून कमी आहे. यामुळे मालडबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.

सन 2014 मध्ये, न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्या खंडपीठाने ज्येष्ठांच्या लोकल प्रवासाबाबत जनहित याचिकेवर सुनावणी घेतली होती. जी. ए. बी. ठक्कर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा राखून ठेवण्याची विनंती केली होती.

सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने जानेवारी 2015 मध्ये पश्चिम आणि मध्य रेल्वेला प्रत्येक लोकलमध्ये 14 आसने ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याची सूचना केली होती. ज्येष्ठांच्या जागेवर अन्य प्रवासी बसणार नाही, याची दक्षता रेल्वेने घ्यावी, अशी सूचना ही केली होती.



हेही वाचा

लेडिज डब्यात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत गणवेशधारी पोलिस तैनात करणार

कल्याण-तळोजा मेट्रो आता नवी मुंबईपर्यंत! बेलापूर-पेंधर मार्गिकेशी जोडली जाणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा