Advertisement

लॉकडाऊनच्या काळात ओलाची विना वातानुकूलित सेवा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ओला कंपनीने विना वातानुकूलित सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनच्या काळात ओलाची विना वातानुकूलित सेवा
SHARES

मुंबईसह राज्याला कोरोनानं विळखा घातला आहे. सर्वत्र कोरोनाच्या संसर्गानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच अनेकांनी कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारला मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये ओला अॅपबेस टॅक्सीनंही मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ओला कंपनीने विना वातानुकूलित सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊन काळात नारंगी आणि हिरव्या झोनमधील शहरांत टॅक्सी चालवण्यास सशर्त मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार ओला कंपनीनं चालक आणि प्रवाशासाठी मार्गदर्शक तत्त्वं जाहीर झाली आहेत. त्यानुसार वाहतूक करताना वाहनातील वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवत खिडक्या उघड्या ठेवून प्रवाशांना सेवा द्यावी, अशा सूचना चालकांना दिल्या आहेत.

प्रवासावेळी प्रवाशांना मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच ग्राहकांनी कॅशलेस व्यवहारावर भर द्यावा, अशा सूचना ओला कंपनीनं केल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा