Advertisement

Coronavirus: कोरोना व्हायरसचा ओला उबर चालकांना फटका

कोरोना व्हायरसचा आंतरराष्ट्रीय बाजारावर मोठा परिणाम झाला असून मुंबईतील ओला व उबर चालकांनाही त्याचा फटका बसत आहे.

Coronavirus: कोरोना व्हायरसचा ओला उबर चालकांना फटका
SHARES

जगभरात जिवघेण्या कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसची लक्षण चीनसह आता भारतातही वाढत चालली आहे. कोरोनाच्या भितीनं नागरिक खबरदारी घेत आहेत. कोरोना व्हायरसला जागतिक साथीचा रोग म्हणून ओळखले गेले आहे. या व्हायरसचे भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं रुग्णालय व दवाखान्यात जाणाऱ्या प्रत्येक रुग्ण व त्यांच्यासह आलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे सल्ले दिले जात आहेत. दरम्यान, या कोरोना व्हायरसचा आंतरराष्ट्रीय बाजारावर मोठा परिणाम झाला असून मुंबईतील ओला व उबर चालकांनाही त्याचा फटका बसत आहे.

परदेशांमध्ये झपाट्यानं पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळं मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. परदेशाहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानं प्रवाशांचे व्हिजा रद्द करण्यात आले आहेत. तसंच, भारतात येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळं ओला व उबर चालकांचं नुकसान होत आहे.

करोनाच्या धास्तीमुळे अनेक ओला, उबर चालक विमानतळ परिसरात फिरकेनासे झाल्यानं परदेशातून किंवा परराज्यातून विमानानं प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना सध्या मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. दुबईवरून आलेल्या करोनाबाधित दाम्पत्याला मुंबईहून पुण्याला नेणाऱ्या ओला चालकाला करोनाची लागण झाली आहे. याची धास्ती इतर वाहनचालकांनी इतकी घेतली असून, ते विमानतळ परिसरात फिककेनासे झाले आहेत.

अनेकांनी करोनाचा प्रभाव नष्ट होईपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांची वाहतूक करणं बंद केलं आहे. काही वाहनचालकांनी तर प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करत घरी बसणं पसंत केलं आहे. मात्र याचा त्रास परदेशवारी करून मुंबई गाठणाऱ्यांना सहन करावा लागत असून, ओला, उबर चालकांना आपल्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागत आहे.

अनेकजण विमानांच्या उपलब्धतेमुळं परदेशातून महाराष्ट्रात परत येताना मुंबई गाठतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टॅक्सी अथवा ओला-उबर घेऊन पुढील तीन-चार तासांचा प्रवास करतात. या लांब पल्ल्याच्या प्रवासी भाड्यांचा चालकांनाही चांगलाच फायदा होतो. त्यामुळं अनेक चालक दिवसभर विमानतळ परिसरात गाडी घेऊन उभे असल्याचं चित्र विमानतळ परिसरात नेहमीचंच असतं. मात्र, परदेशवारी केलेल्या दाम्पत्याला घेऊन प्रवास करणाऱ्या ओला चालकालाच करोना विषाणूची लागण झाल्याचं समजताच वाहनचालकांमध्ये भीती पसरली आहे. त्यातून अनेक चालकांनी या रोगाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत विमानतळावरून प्रवासी वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला आहे.


ओला, उबर चालकांनी गाडी चालविणं बंद केल्यानं दरदिवशी ३ हजार ते ४ हजार रुपयांचं नुकसान होत आहे. मात्र, चालकांनी आजार होऊ नये यासाठी ही खबरदारी घेत असल्याचं समजतं. गाडीनं प्रवास करणारा प्रवासी करोनाबाधित असल्यास ओला-उबर चालकांनाही आजार जडण्याची भीती आहे. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावरून प्रवासी वाहतूक करणं बहुतांश चालकांनी बंद केलं आहे.

कोरोनाच्या धास्तीमुळं सध्या मुंबईतील ओला, उबर चालक स्थानिक प्रवासी भाडीच स्वीकारत आहेत. ओला कंपनीनं चालकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायजर, मास्क आदी साहित्याचा पुरवठा वाहनचालकांना केला आहे. त्यातून चालकांची सुरक्षितता सुनिश्चित करून प्रवाशांनाही सुरक्षित प्रवास मिळेल. तसंच, चालक आणि प्रवाशांसाठी उद्भवणाऱ्या समस्यांसाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आल्याचं ओला कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

कोरोना व्हायरस हा बरा होणार असल्यामुळं नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. मात्र, खबरदारी घेतली पाहिजे असं सल्ले डॉक्टर देत आहेत. तसंच, कोरोनाची लक्षण आढळल्यास सरकारद्वारे 91-11-23978046 या हेल्पलाइन क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळं या क्रमांकावर संपर्क केल्यास तात्काळ उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोनाचा बचावर ही आपण करून शकतो.  

कोरोनाचा बचाव करण्यासाठी हे उपाय करा : 

  • नियमित हात धुवा.
  • मास्क वापरा.
  • सुरक्षित अंतर राखा.
  • नाक, तोंड, डोळ्यांना वारंवार हात लावू नका.
  • रुमालाचा वापर करा.
  • मोबाईलची स्क्रीन स्वच्छ ठेवा.
  • बाथरुम स्वच्छ ठेवा.
  • विमान प्रवासात घ्यावयाची काळजी.
  • प्रवास सहसा टाळा.
  • गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
  • दुर्लक्ष करु नका.
  • अफवा पसरवू नका.



हेही वाचा -

Coronavirus Updates: यंदाची IPL रद्दच करा, केंद्राची BBCI ला सूचना

Coronavirus Updates: कोरोनाच्या धसक्याने शिर्डीतली गर्दीही घटली!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा