Advertisement

एकात्मिक तिकीट प्रणालीची प्रतीक्षा लवकरच संपणार

मेट्रो, बस, मोनोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण एकाच तिकिटांच्या माध्यमातून आता मेट्रो, बस, मोनोचा प्रवास करता येणार आहे.

एकात्मिक तिकीट प्रणालीची प्रतीक्षा लवकरच संपणार
SHARES

मेट्रो, बस, मोनोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण एकाच तिकिटांच्या माध्यमातून आता मेट्रो, बस, मोनोचा प्रवास करता येणार आहे. या एकात्मिक तिकीट प्रणालीची अंमलबजावणी मेट्रो २ दहिसर ते डी.एन.नगर आणि दहिसर ते अंधेरी या मेट्रो ७ साठी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएमआरडीएकडून (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) देण्यात आली. सध्या या दोन्ही मार्गावर मेट्रो रेल्वेगाड्यांची चाचणी सुरु आहे.

सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी एकाच तिकिटाचा पर्याय देणाऱ्या एकात्मिक तिकीट प्रणालीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट व इतर सार्वजनिक परिवहन उपक्रमांसाठी एकच तिकीट असावे यासाठी एकात्मिक तिकीट प्रणालीची योजना बऱ्याच वर्षांपूर्वी आखण्यात आली होती. प्रवास वेळ, प्रवास खर्च वाचावा तसेच लवकरात लवकर पोहोचण्याचे मार्ग आणि पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणारी आहे.

एमएमआरडीएकडून मेट्रो २ अ दहिसर ते डी.एन.नगर आणि मेट्रो ७ दहिसर ते अंधेरी प्रकल्प राबविण्यात आला आहे. सध्या यातील दोन्ही मार्गावर डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान २० किलोमीटर अंतरावर मेट्रो रेल्वेगाड्यांची चाचणी सुरू आहे. या संपूर्ण मार्गावरील पहिला टप्पा ऑक्टोबर २०२१ पासून आणि त्यानंतर पूर्ण मार्गावर मेट्रो गाडय़ा जानेवारी २०२१ किंवा त्यानंतर चालवण्याचे नियोजित आहे.

मार्ग सेवेत येताच प्रवाशांसाठी एकात्मिक तिकीट प्रणालीची अंमलबजावणी होईल. त्यानंतर इतर मेट्रो आणि मोनो रेल मार्गासाठी आणि बेस्ट, रेल्वेसाठीही टप्प्याटप्यात अंमलबजावणी केली जाईल, असे ‘एमएमआरडीए’कडून स्पष्ट करण्यात आले. प्रवासात तिकीट किंवा पास काढण्यासाठी लागणाऱ्या रोख रकमेचा व्यवहार टाळण्यासाठी आणल्या जाणाऱ्या ‘एक देश एक कार्ड’ योजनेला प्रायोगिक तत्त्वावर बेस्ट उपक्रमातही सुरुवात झाली असून त्याच्या तांत्रिक चाचण्या सुरू आहेत.

हे कार्ड रेल्वे, मेट्रो-मोनोसाठीही वापरता येणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून ‘वन नेशन, वन कार्ड’साठी लागणाऱ्या हार्डवेअरच्या चाचणीला कुलाबा आणि वडाळा आगारात सुरुवात केली आहे.




हेही वाचा - 

पुढच्या २ ते ४ आठवड्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येणार?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती

मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे; मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा