Advertisement

परळ टर्मिनसला पुढच्या वर्षीचा मुहूर्त!

येत्या दीड महिन्यात प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, या टर्मिनसच्या इतर तांत्रिक कामांनाही वेग आला आहे. पण, हे टर्मिनस पूर्णपणे सेवेत येण्यासाठी मार्च २०१९ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

परळ टर्मिनसला पुढच्या वर्षीचा मुहूर्त!
SHARES

दादर रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी परळमध्ये उभारण्यात येणाऱ्या टर्मिनसच्या कामाला गती आली आहे. येत्या दीड महिन्यात प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, या टर्मिनसच्या इतर तांत्रिक कामांनाही वेग आला आहे. पण, हे टर्मिनस पूर्णपणे सेवेत येण्यासाठी मार्च २०१९ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.दादर स्थानकावरचा वाढता ताण

मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या दादर स्थानकावर गेल्या काही वर्षांत मोठया प्रमाणात लोकल गाड्यांचा आणि प्रवाशांचा ताण वाढत आहे. परिणामी भविष्यात या स्थानकातून लोकल गाडयांची वर्दळ वाढवणं कठीण आहे. त्यामुळे परळ स्थानकातूनही लोकल सोडता येऊ शकतात का? याची चाचपणी रेल्वेकडून केली जात होती.


परळ टर्मिनससाठी ९० कोटींचा खर्च

अखेर परळ टर्मिनस बनवणं शक्य असल्याचं निदर्शनास आल्यानंतर साधारण दीड वर्षांपूर्वी या प्रकल्पातील कामांना सुरुवात करण्यात आली. दरम्यान, रेल्वेच्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी-२) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ल्यापर्यत पाचवा-सहावा मार्ग होत आहे. या मार्गाचाच परळ टर्मिनस हा एक भाग आहे. या मार्गासाठी ८९१ कोटी रुपये खर्च येणार असून यातील परळ टर्मिनससाठी ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.१५ डब्बा गाड्यांसाठीही सोय

परळ टर्मिनस प्रकल्पात सध्याच्या प्लॅटफॉर्मच्या बाजूलाच एक टर्मिनल लाइन असून त्याच्या दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म असेल. हा प्लॅटफॉर्म १० मीटर रुंद असेल आणि भविष्यात १५ डब्बा गाड्याही इथे चालवता येऊ शकतील, या दृष्टीने प्लॅटफॉर्मचे बांधकाम केले जात आहे.


जे. जे. स्कूलने बनवला आराखडा

या टर्मिनसचा आराखडा जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सकडून तयार करण्यात आला असून आधुनिक असे हे टर्मिनस बांधण्यात येणार आहे. परळ टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मवर लिफ्ट, सरकते जिनेही बांधले जाणार आहेत. सध्या नवीन प्लॅटफॉर्मच्या कामाला गती देण्यात येत असून हे काम एप्रिल २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.हेही वाचा

मध्य रेल्वेची फुकट्या प्रवाशांकडून १४३ कोटींची दंडवसुली


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा