Advertisement

'दादर-रत्नागिरी पॅसेंजर दादरपर्यंत नियमित चालवा'


'दादर-रत्नागिरी पॅसेंजर दादरपर्यंत नियमित चालवा'
SHARES

कोकणात जाणाऱ्या  चाकरमान्यांसाठी दादर-रत्नागिरी पॅसेंजर ही ट्रेन नियमितपणे दादरपर्यंतच चालवावी आणि तेथूनच सोडण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असल्यामुळे हा निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार निरंजन डावखरे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.

ही पॅसेंजर गाडी कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांवर थांबत असल्याने तसेच तिकिटाचे दर देखील कमी असल्याने बाराही महिने ही गाडी प्रवाशांनी खच्चून भरलेली असते.

पण अनेकदा या पॅसेंजर गाडीचे तिकिटच मिळत नसल्याने चाकरमान्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. त्यातच गेले काही दिवस ही गाडी दादर स्थानकाहून न सुटता मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकातून सुटते. परतीच्या प्रवासात देखील ही गाडी दादरला न पोचता दिवापर्यंतच येते. त्याचा मोठा त्रास प्रवाशांना होत आहे.

गर्दीच्या वेळी हातात ओझे घेऊन प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी धावपळ करावी लागते. यात प्रवाशांच्या वेळेचा देखील अपव्यय होतो. त्यामुळे ही पॅसेंजर ट्रेन दादरहूनच सोडावी तसेच दादरपर्यंतच आणावी, अशी विनंती आमदार निरंजन डावखरे यानी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.


हे देखील वाचा - 

एसटी प्रशासनाला पावला विठोबा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा