Advertisement

रेल्वे स्टॉल्सवरही प्लास्टिकबंदी?

राज्य सरकारनेे प्लास्टिकवर घातलेली बंदी रेल्वे स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांनाही लागू होऊ शकते. याबाबतची सूचना राज्य सरकारकडून रेल्वेला मिळालेली नसली तरीही तशी सविस्तर सूचना येताच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

रेल्वे स्टॉल्सवरही प्लास्टिकबंदी?
SHARES

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिकवरील वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी रेल्वे स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांनाही लागू होऊ शकते. याबाबतची सूचना राज्य सरकारकडून रेल्वेला मिळालेली नसली तरीही तशी सविस्तर सूचना येताच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


आधीही बंदी

दरवर्षी पावसाळ्यात मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांवर पाणी साचतं. त्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प होते. रुळांवर मोठया प्रमाणात येणारा कचरा आणि त्यात बहुतांश असणाऱ्या प्लास्टिकमुळे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होत नाही. यालाच उपाय म्हणून मे २०१२ मध्ये मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध कुमार जैन यांनी रेल्वे स्टॉल्सवर प्लास्टिकच्या पाऊचमधून विकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थावर बंदी आणली होती.


याचिका निकाली

जवळपास २५ खाद्यपदार्थांवर ही बंदी होती. मात्र स्टॉल्सधारकांनी तसंच काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या निर्णयात हस्तक्षेप करत रेल्वेलाा विरोध केला. त्यानंतर न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर रेल्वे स्टाॅलवरील प्लास्टिकच्या पाऊचमधील खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यास न्यायालयाने नकार दिला आणि २०१४ साली ही याचिका निकाली काढली.


वाढतं प्रमाण 

त्यानंतर रेल्वेने वेळोवेळी विविध उपाययोजना करूनही रुळांवर येणारा कचरा आणि त्यासोबतचे प्लास्टिकचं प्रमाण काही केल्या कमी झालं नाही. यासाठी रेल्वेकडून एक कचरा विशेष गाडीही चालवण्यात येते. तरीही त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर किमान रुळांवर येणारे प्लास्टिक कमी होईल, अशी आशा रेल्वेला आहे. या बंदीत रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सचाही समावेश आहे का? याची माहिती रेल्वेकडून घेतली जात आहे.



हेही वाचा-

यापुढे प्लास्टिक वापराल तर, होईल ३ महिन्यांची शिक्षा!

मंत्रालयात उभारणार प्लास्टिक बॉटल्सवर प्रक्रिया करणारी मशीन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा