Advertisement

रेल्वेची शक्कल; स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी घेतला 'हा' निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराच्या नियमांच पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

रेल्वेची शक्कल; स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी घेतला 'हा' निर्णय
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराच्या नियमांच पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, सद्यस्थितीत या नियमांच पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच रेल्वे प्रवास सुरू झाला असून, स्थानकातही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळं ही वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशानानं नवी शक्कल लढवली आहे. गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्म तिकिट दरात ५ पटीनं वाढ केली आहे.

मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट आकारण्यात येत आहे. हा तिकिट दर पाचपटीने वाढविण्यात आला आहे. परिणामी प्रवासाव्यतिरिक्त स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना चाप बसणार आहे. मुंबईत सध्या प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर हा १० रुपये आहे. सीएसएमटी, एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल स्थानकावर हा दर आता ५० रुपये करण्यात आला आहे.

हे नवे प्लॅटफॉर्म तिकीट दर ८ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. पुढील सूचना येईपर्यंत हे दर राहणार आहेत. या रेल्वे स्थानकांवर गर्दीचे प्रमाण खूप आहे. सणासुदीच्या काळात ते आणखी वाढते. नातेवाईकांना सोडण्यास आलेले नागरिक प्लॅटफॉर्मवर येतात. यामुळे ही गर्दी आणखी वाढते. ही गर्दी कमी करण्यासाठी तसेच कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा