Advertisement

मध्य रेल्वेवरील 'या' स्थानकांचा होणार कायापालट, कामांचा शुभारंभ

विक्रोळी आणि परळ स्थानकांचा कायापालट करण्यासाठी प्रत्येकी 19 कोटी रुपये दिले जातील, तर कांजूरमार्गला नियोजित सुधारणांसाठी 27 कोटी रुपये मिळतील.

मध्य रेल्वेवरील 'या' स्थानकांचा होणार कायापालट, कामांचा शुभारंभ
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत भारत स्थानक सुधारणा योजना सुरू करणार आहेत, ज्यामुळे मुंबई विभागातील 15 उपनगरीय स्थानकांचा कायापालट होणार आहे. 

परळ, विक्रोळी आणि कांजूरमार्ग ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील निवडलेली पहिली तीन स्थानके आहेत.

"या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत, पुढील वर्षभरात सर्व 15 उपनगरीय स्थानकांमध्ये मोठे परिवर्तन होणार आहे," असे सीआरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई विभागातील निवडक स्थानकांमध्ये भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, इगतपुरी, वडाळा रोड आणि सँडहर्स्ट रोड यांचा समावेश आहे.

या स्थानकांच्या अपग्रेडमध्ये विविध वैशिष्ट्यांचा समावेश असेल, जसे की प्रवेशद्वार लॉबीसह दर्शनी भागात सुधारणा, पादचारी मार्ग तसेच शक्य असेल तेथे FOBs (फूट ओव्हर ब्रिज) चे रुंदीकरण करण्यात येईल. 

सीआरच्या मते, प्रकल्पामध्ये नवीन टॉयलेट ब्लॉक, आसन व्यवस्था आणि वेटिंग रूम आणि इतर कार्यालयांमध्ये फर्निचरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

वॉटर बूथ देखील सुधारण्यात येतील. याशिवाय, सध्याच्या स्टेशनच्या छतांची डागडुजी,  बुकिंग कार्यालयांसाठी अंतर्गत सुधारणा तसेच संपूर्ण स्थानकांमध्ये लायटिंग आदी गोष्टी सुधारण्यात येणार आहेत.

अतिरिक्त एस्केलेटर आणि लिफ्ट्स, ट्रेन इंडिकेशन बोर्ड, ट्रेनची माहिती देण्यासाठी व्हिडिओ डिस्प्ले युनिट्स हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे. स्वच्छता राखण्यासाठी डस्टबिन देखील असतील.

अमृत भारत स्थानक सुधारणा योजनेमध्ये संपूर्ण भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये एकूण 1,309 स्थानके समाविष्ट आहेत, ज्यामध्ये 76 स्थानके मध्य रेल्वेचा भाग आहेत. यापैकी, रविवारपासून सीआरच्या मुंबई विभागातील परळ विक्रोळी आणि कांजूरमार्ग या तीन उपनगरीय स्थानकांसह 38 स्थानकांवर काम सुरू होणार आहे.

विक्रोळी आणि परळ स्थानकांचा कायापालट करण्यासाठी प्रत्येकी 19 कोटी रुपये दिले जातील, तर कांजूरमार्गला नियोजित सुधारणांसाठी 27 कोटी रुपये मिळतील.

"या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात हे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कचे आधुनिकीकरण आणि अत्याधुनिक सुविधा पुरवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, ज्यामुळे लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे," असे CR चे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.



हेही वाचा

'या' 2 वंदे भारत एक्सप्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकावर थांबणार

मुंबईतल्या 'या' भागांमधील बेस्टची बस सेवा विस्कळीत, कंत्राटी चालक बेमुदत संपावर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा