Advertisement

मुंबईतल्या 'या' भागांमधील बेस्टची बस सेवा विस्कळीत, कंत्राटी चालक बेमुदत संपावर

बस येण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याने बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.

मुंबईतल्या 'या' भागांमधील बेस्टची बस सेवा विस्कळीत, कंत्राटी चालक बेमुदत संपावर
SHARES

घाटकोपर आणि मुलुंड आगारांमध्ये कंत्राटी चालकांनी पगार वाढीकरिता काम बंद आंदोलन केले आहे. SMT (Daga) ग्रुप कंत्राटदार असल्याची माहिती मिळत आहे. मुलुंड आणि घाटकोपर बस आगारातील या बस गाड्या आहेत.

बेस्टच्या (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रम) कंत्राटी कामगारांनी बुधवारी (२ ऑगस्ट) सकाळी मुंबईतील घाटकोपर आगारात बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

बस येण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याने बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.

मात्र, कंत्राटदारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना धक्का बसला आणि त्यामुळे सेवांवर परिणाम होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार हा संप फक्त घाटकोपरपुर आणि मुलुंडपर्यंत मर्यादित असल्याचे सांगण्यात येत आहे.

पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांबाबत हे कंत्राटी कर्मचारी मागणी करत होते. या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या बेस्टच्या कंत्राटी कामगारांनीही हा स्ट्राईक केला आहे.

बेस्ट बस संपाचा वाहतुकूीवर परिणाम

आझाद मैदान सुरू असलेल्या येथील बेस्ट आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घाटकोपर, मुलुंड येथील बेस्ट कंत्राटी कामगारांनी संप पुकारला आहे. बेस्ट कंत्राटी कामगार चालक आणि वाहक यांनी केलेल्या संपामुळे आज मुंबईमधील बेस्ट वाहतुकीवर परिणाम झाला. 

कामगारांच्या नेमक्या मागण्या काय? 

  • पगारवाधीची मागणी
  •  बेस्टचे सर्व बंद बसमार्ग पूर्ववत सुरु करा, प्रत्येक बस मार्गावर बसगाड्यांची संख्या वाढवून बसफेऱ्या वाढवा.
  • नादुरुस्त बसगाड्या दुरुस्ती केल्याशिवाय मार्गस्थ करणे बंद करा.
  • मुंबईसाठी बेस्टचा स्वमालकीचा ताफा दुप्पट म्हणजेच किमान ६,००० बसेसचा करा.



हेही वाचा

"भारतात राहायचंय तर फक्त मोदींना, योगींना मत द्या", गोळीबारीनंतरचा RPF कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल

मुंबईकरांनो लक्ष द्या! पुढचे 6 दिवस हाय टाईड, पालिकेचा इशारा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा