SHARE

मुंबई - मध्य रेल्वेवर भायखळा येथील पुलाच्या तांत्रिक कामासाठी मेनलाईनच्या सँडहर्स्ट रोड आणि करीरोड स्थानकांदरम्यान चारही मार्गावर शनिवारी रात्री 11.40 ते पहाटे 5.50 पर्यंत पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते परळ दरम्यान डाऊन दिशेने सुटणाऱ्या धिम्या लोकल सकाळी 11.30 ते पहाटे 5.46 पर्यंत डाऊन जलद मार्गाने चालवण्यात येतील.

रात्री 11.26 ते पहाटे 5.46 दरम्यान परळ ते सीएसटी अप धिम्या मार्गावरील गाड्या अप जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे यावेळेत कुर्ला, ठाणे गाड्या रद्द होतील, प्रवाशांना मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करीरोड दरम्यान लोकल उपलब्ध होणार नाहीत.

डाऊन सेवा रद्द लोकल अप सेवा रद्द लोकल
सीएसटी-कुर्ला रा.11.25 वा. कुर्ला-सीएसटी प.5.42 वा.
सीएसटी-ठाणे रा. 12.34 वा. कुर्ला-सीएसटी प.5.54 वा.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या