Advertisement

रेल्वेगाड्या उशीरा धावल्यास वरिष्ठांच्या पदोन्नतीला 'ब्रेक'!

विलंबानं धावणाऱ्या रेल्वे गाड्या ही तर जणू भारतीय रेल्वेची ओखळच बनली आहे. मात्र यामुळे रेल्वे प्रवाशांना किती हालापेष्टा सहन कराव्या लागतात याचं जराही शल्य रेल्वे प्रशाासनाला असल्याचं दिसत नाही. परंतु यापुढं कदाचित तसं होणार नाही कारण एखादी रेल्वेगाडी उशिरा धावल्यास त्यासाठी थेट संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाणार आहे. एवढंच नव्हे, तर त्याचं प्रमोशन अर्थात पदोन्नती रोखण्यात येणार आहे.

रेल्वेगाड्या उशीरा धावल्यास वरिष्ठांच्या पदोन्नतीला 'ब्रेक'!
SHARES

रेल्वेचा प्रवास, त्यातही तो लांब पल्ल्याचा असल्यास गाडी पोहोचायला हमखास उशीर होणार याचं पक्क समीकरण आता प्रवाशांच्या डोक्यात फिट्ट झालं आहे. याला कारण म्हणजे रेल्वेगाड्यांना नेहमीच होणार उशीर. विलंबानं धावणाऱ्या रेल्वे गाड्या ही तर जणू भारतीय रेल्वेची ओखळच बनली आहे. मात्र यामुळे रेल्वे प्रवाशांना किती हालापेष्टा सहन कराव्या लागतात याचं जराही शल्य रेल्वे प्रशाासनाला असल्याचं दिसत नाही. परंतु यापुढं कदाचित तसं होणार नाही कारण एखादी रेल्वेगाडी उशिरा धावल्यास त्यासाठी थेट संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाणार आहे. एवढंच नव्हे, तर त्याचं प्रमोशन अर्थात पदोन्नती रोखण्यात येणार आहे.


अधिकाऱ्यांची शाळा

रेल्वेगाड्यांना होणारा विलंब यावर नुकतीच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत रेल्वेचं वेळापत्रक कोलमडण्याच्या मुद्द्यावरून गोयल यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतल्याची माहिती समोर येत आहे. गाड्यांना विलंब होत असेल तर ज्यांच्यामुळं विलंब होतोय त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असं म्हणत गोयल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचं प्रमोशन रोखण्याचा उपाय शोधून काढला आहे.


३० जूनपर्यंतचा अवधी

गोयल यांनी यासंबंधीचे आदेश सर्व महाव्यवस्थापकांना दिले आहेत. गोयल यांच्या आदेशानुसार जी गाडी उशीरा धावेल, त्या गाडीशी संंबंधित वरिष्ठ अधिकार्याचं प्रमोशन रोखण्यात येणार आहे. तर पुढचा महिनाभर, अर्थात ३० जूनपर्यंत रेल्वेगाड्याचं वेळापत्रक ट्रॅकवर आलं नाही, तर जुलैपासून वरिष्ठ अधिकाऱ्याचं प्रमोशन रोखा असंही गोयल यांनी ठणकावलं आहे.


उपाय फळणार?

असं झाल्यासच अधिकाऱ्यांवर वचक राहिल आणि त्यांच्या कामामध्ये सुधारणा होईल, असं म्हणत गोयलांनी हे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. गोयलांच्या या रामबाण उपायानंतर तरी रेल्वेचं वेळापत्रक सुधारेल आणि प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा करण्यास हरकत नाही.



हेही वाचा-

जेट एअरवेजचे १५८ प्रवासी मुंबई विमानतळावर अडकले

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचं गिफ्ट



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा