रेल्वे म्हणजे मुंबईची लाईफलाईन. याच रेल्वेतून दररोज 75 लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. या प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांच्या जीवाला धोका होऊ नये, म्हणून आता प्रयत्न करण्यात येत आहे.
रेल्वेचे वाढते अपघात कसे रोखता येऊ शकतात? किंवा रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा त्रास कसा कमी करता येऊ शकतो? या विषयावर चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच रेल्वेच्या काही संघटना एकत्र आल्या. एकूण 17 संघटनांचा या चर्चेत समावेश होता.
पहिल्यांदाच रेल्वेची युनियन आणि प्रवासी संघटना चर्चा करण्यासाठी एकत्र आले आहेत. दिवसेंदिवस रेल्वेच्या वाढणाऱ्या दुर्घटनांसाठी ही चर्चा घेण्यात आली. झोपलेल्या शासनाला कुठेतरी जागं करण्यासाठी आता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, म्हणून ही चर्चा घेण्यात आली.
सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना
एखाद्या मोटरमनकडून चूक झाली, की प्रवासी संघटनेचे अधिकारी त्याला मारहाण करतात. याचा फायदा कोणालाच होणार नाही. पण, यातून काय मार्ग काढता येऊ शकेल? यावरही या चर्चासत्रात विचारविनिमय करण्यात आला. रेल्वेचं कन्स्ट्रक्शन असो किंवा प्लॅटफॉर्मची उंची, रेल्वेत आणखी काय बदल आणि नव्या सुविधा आणता येऊ शकतील? अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा