Advertisement

रेल्वे बोर्डाकडून जोगेश्वरी टर्मिनसच्या कामाला मंजूरी

जोगेश्वरी टर्मिनसच्या 69 कोटींच्या वर्क ऑर्डरला रेल्वे बोर्डाकडून मंजूरी मिळाली आहे.

रेल्वे बोर्डाकडून जोगेश्वरी टर्मिनसच्या कामाला मंजूरी
SHARES

जोगेश्वरी टर्मिनसच्या 69 कोटींच्या वर्क ऑर्डरला रेल्वे बोर्डाकडून मंजूरी मिळाली आहे. अडीच कोटी खर्च करुन जोगेश्वरीत दोन प्लॅटफॉर्म बांधण्यात आले आहेत. आता 69 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी मिळाल्याने रेल्वे रुळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा यासारखी तांत्रिक कामंही केली जाणार आहेत. टीव्ही ९ नं यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

पश्चिम रेल्वेचे दोन प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जोगेश्वरी टर्मिनसच्या (Jogeshwari Terminus) वर्क ऑर्डरला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. त्यामुळे आता रेल्वे रुळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आदी कामे केली जातील. येत्या दोन-अडीच वर्षांत जोगेश्वरी टर्मिनसचे काम होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या पाहता मध्य रेल्वेनं परळ स्थानक टर्मिनस करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं दादर स्थानकातून सुटणाऱ्या एकूण ३२ गाड्यांमधील १६ गाड्या या परळ टर्मिनसहून सुटणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर देखील लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेवरील टर्मिनसवर येणारा भार कमी करण्यासाठी जोगेश्वरी स्थानकात टर्मिनस उभारण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आला होता.

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परळ स्थानकात टर्मिनस उभारण्यात येत आहे. या टर्मिनसमुळे लोकल गाड्यांसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा वाढता भार कमी होणार आहे.

टर्मिनसप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावर ४२ पादचारी पुल उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी १०० कोटी ८७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्याचप्रमाणं, मध्य रेल्वेवरील विविध स्थानकात पादचारी पुल उभारण्यात येणार असून या कामासाठी ८० कोटी रुपये खर्च येणार आहे.हेही वाचा

17 मे पासून 'ही' ट्रेन 2 विस्टाडोम कोचसह धावणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा