Advertisement

फुकट्यांकडून रेल्वेने वसूल केला २६० कोटींचा दंड

पश्चिम रेल्वेने (Western Railway) रेल्वेमध्येे फिरणाऱ्या २४०३ भिकारी आणि ५२७८ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे.

फुकट्यांकडून रेल्वेने वसूल केला २६० कोटींचा दंड
SHARES

पश्चिम रेल्वेवर (Western Railway) विनातिकीट प्रवास ( without ticket passenger) करणारे आणि बेकायदेशीरपणे सामानाची वाहतूक करणाऱ्यांकडून एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत ११३.५३ कोटी रुपयांचा दंड (Penalties) वसूल करण्यात आला आहे. मागील वर्षी वसूल झालेल्या दंडापेक्षा ही रक्कम ७.४० टक्के अधिक  आहे.  

मध्य रेल्वेने (central Railway) फुकट्यांकडून एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत १६८.०९ कोटींचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी मध्य रेल्वेने  या कालावधीत १४७ कोटींचा दंड (Penalties) वसूल केला होता. पश्चिम रेल्वेने (Western Railway) रेल्वेमध्येे फिरणाऱ्या २४०३ भिकारी आणि ५२७८ अनधिकृत फेरीवाल्यांवर  कारवाई केली आहे. १२५५ जणांना तुरूंगात पाठवलं. 

मध्य रेल्वेने (central Railway) जानेवारी महिन्यात विनातिकीट करणाऱ्या प्रवाशांवर २.८२ लाख गुन्हे नोंदवले आहेत. मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात २.५१ लाख  गुन्हे दाखल केले होते. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत  विनातिकीट तसंच बेकायदा सामानाची वाहतूक केल्या प्रकरणात ३२.७१ लाख केसेस दाखल झाल्या होत्या. तर गेल्या वर्षी याच काळात २९.५६ केसेस दाखल झाल्या होत्या. हेही वाचा -

रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून कबड्डीपट्टूंना लाखोंचा गंडा

कोरोना संदर्भात अफवा पसरवताय? होऊ शकते शिक्षा
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा