रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून कबड्डीपट्टूंना लाखोंचा गंडा

रेल्वेत (railway) नोकरीचं (job) आमिष (Bait) दाखवून मुंबईतील कबड्डीपट्टूंना लाखोंचा गंडा घालणाऱ्याला पोलिसांनी अटक (arrest) केली आहे.

रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून कबड्डीपट्टूंना लाखोंचा गंडा
SHARES
रेल्वेत (railway) नोकरीचं (job) आमिष (Bait) दाखवून मुंबईतील कबड्डीपट्टूंना लाखोंचा गंडा घालणाऱ्याला पोलिसांनी अटक (arrest)केली आहे. आरोपीने प्रत्येकी ५ ते ७ लाख रुपये घेऊन अनेकांची फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे. कबड्डी खेळाडूंनीच आरोपीला एका कबड्डी खेळाडूकडून लाच घेताना रंगेहाथ पकडलं. प्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबईतील कबड्डी खेळाडूंना (Kabaddi player) रेल्वे (railway) खात्यात नोकरीला लावतो, असं आमिष दाखवून दर्पण साखरकर याने या खेळाडूंकडून प्रत्येकी ५ ते ७ लाख रुपये घेतले. मात्र, साखरकरने नोकरी न लावल्याने आपली फसवणूक झाल्याचं या खेळाडूंच्या लक्षात आलं. हे खेळाडू मागील ५ महिने त्याचा शोध घेत होते. अखेरीस बुधवारी त्याला कुर्ला  (kurla) येथे एका कबड्डी खेळाडूकडून ५ लाख रुपये घेत असताना रंगेहाथ पकडले. 

 गेली दीड वर्ष साखरकर मुंबई परिसरातील कबड्डी खेळाडूंना (Kabaddi player) नोकरीचं  (job) आमिष देऊन लुबाडत होता. कुणाकडून साडेचार लाख रुपये, तर कुणाकडून पाच ते सहा लाख रुपये अशी रक्कम सांगून तो त्यांच्याकडून हप्त्याहप्त्याने पैसे वसूल करत होता. कबड्डी खेळाडूही आपल्याला नोकरी मिळेल या आशेने त्याला कधी रोख तर कधी चेकने पैसे देत होते. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून तो  अचानक गायब झाला आणि त्याचा फोनही बंद होता. त्यानंतर हे सर्व कबड्डी खेळाडू त्याचा शोध घेत होते. 

बुधवारी संध्याकाळी एका कबड्डी खेळाडूला (Kabaddi player) नोकरी (job) लावण्याचे आमिष (Bait) दाखवून त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी तो कुर्ला (kurla) परिसरात आला. याची माहिती इतर खेळाडूंना कळताच त्यांनी सापळा रचून त्याला पकडलं. यावेळी त्याने कुणाकुणाची फसवणूक केली आणि किती पैसे उकळले याची माहिती लेखी स्वरुपात या खेळाडूंनी घेतली आणि त्याला काळाचौकी पोलिसांच्या स्वाधीन केलं. साखरकर रेल्वेत नोकरीला होता. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून तो कामावर हजर झालेला नाही. केवळ कबड्डी खेळाडू नव्हे तर शासकीय रुग्णालय, शासकीय कार्यालयात आपली ओळख असून तुम्हाला नोकरी लावतो असं तो सांगत असायचा. त्याने दादर परिसरात दोन ते अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मुंबईच्या इतर भागातील तरुणांची मोठ्या प्रमाणात याने फसवणूक केली असल्याचा अंदाज आहे. दर्पण साखरकरला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी कळताच फसवणूक झालेले तरुण काळाचौकी पोलीस स्टेशनसमोर जमू लागले. या प्रकरणाचा तपास काळाचौकी पोलीस करत आहेत.



हेही वाचा -

कुख्यात गुंडाला या पोलिस अधिकाऱ्याने दिलं अभय

चीनमधून आईचा मृतदेह आणण्यासाठी डाॅक्टर मुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांच्या जनजागृतीसोबत नियमसक्तीची गरज




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा