Advertisement

कोरोनामुळं रेल्वे रुळावर होणाऱ्या अपघातांत घट

कोरोनामुळं या अपघातात घट झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनामुळं रेल्वे रुळावर होणाऱ्या अपघातांत घट
SHARES

मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये दररोज अनेक प्रवासी प्रवास करतात. या रेल्वे प्रवासावेळी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. परंतु, कोरोनामुळं या अपघातात घट झाल्याची माहिती समोर येत आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलिसांकडे जानेवारी ते डिसेंबर २०२० पर्यंत मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यातून पडून किंवा रेल्वे रूळ क्रॉस करताना किती लोकांच्या मृत्यू व जखमी झाले आहेत, याची माहिती मागितली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरी रेल्वे रुळावर रेल्वेगाड्यातून पडून किंवा रेल्वे रूळ क्रॉस करताना १११६ प्रवाशांनी आपले जीव गमावले आहेत. यामध्ये ९८३ पुरुष व १३३ महिला प्रवाशांचा समावेश आहे. तसंच, ८७८ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये ६८८ पुरुष व १९० महिला प्रवाशांचा समावेश आहे.

मध्य रेल्वे मार्गावर एकूण ५२३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, व ७४७ प्रवासी जखमी झाले आहेत. तसंच, पश्चिम रेल्वे मार्गावर मार्गावर एकूण ३६९ प्रवाशांचा मृत्यू व ३५५ प्रवाशी जखमी झाले आहे.

मृत्यू व जखमींची संख्या

 • रेल्वे रूळ ओलांडताना ७३० प्रवाशांचा मृत्यू,१२९ जखमी 
 • चालत्या गाड्यातून पडून १७७ प्रवाशांची मृत्यू, ३६१ जखमी 
 • खांबाचा फटका लागून २ प्रवाशांची मृत्यू, १२ जखमी प्लाटफार्ममध्ये पडून १ प्रवाशांची मृत्यू, ७ जखमी 
 • विजेचा शॉक लागून ४ प्रवाशांची मृत्यू, ७ जखमी 
 • आत्महत्या करून २७ प्रवाशांची मृत्यू 
 • आजारपणे १६७ प्रवाशांची मृत्यू, ११४ जखमी 
 • अन्य कारणाने ६ प्रवाशांची मृत्यू, १५५ जखमी
 • अज्ञात कारणाने २ प्रवाशांची मृत्यू, १ जखमी 


मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळ ओलांडताना २०१३ ते २०१९ पर्यंत एकूण २४५३४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून एकूण २६६७५ प्रवासी जखमी झाले आहेत.

वर्षाप्रमाणे किती मृत्यू व जखमी

 • २०१३ मध्ये एकूण ३५०६ प्रवाशांच्या मृत्यू, ३३१८ जखमी 
 • २०१४ मध्ये एकूण ३४२३ प्रवाशांच्या मृत्यू, ३२९९ जखमी 
 • २०१५ मध्ये एकूण ३३०४ प्रवाशांच्या मृत्यू, ३३४९ जखमी 
 • २०१६ मध्ये एकूण ३२०२ प्रवाशांच्या मृत्यू, ३३६४ जखमी 
 • २०१७ मध्ये एकूण ३०१४ प्रवाशांच्या मृत्यू, ३३४५ जखमी 
 • २०१८ मध्ये एकूण २९८१ प्रवाशांच्या मृत्यू, ३३४९ जखमी
 • २०१९ मध्ये एकूण २६६४ प्रवाशांच्या मृत्यू, ३१५८ जखमी
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा