रेल्वे रोको कराल... तर जेलमध्ये जाल

 Pali Hill
रेल्वे रोको कराल... तर जेलमध्ये जाल

मुंबई - लोकल सेवा विस्कळीत होणे हे मुंबईकरांसाठी काही नवे नाही. अशावेळी त्यांच्या संतापाचा उद्रेक होतो आणि मग हे प्रवाशी रेल्वे रोको आंदोलनाचे हत्यार उपसतात. पण आता रेल्वे रोको आंदोलनात सहभागी होणं नोकरदारांना महागात पडू शकतं. कारण यापुढे आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल नोकरदारांवर रेल्वेकडून अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळं ‘रेल्वे रोको’त सहभागी होताना नोकरदारांना विचार करावा लागणार आहे. वारंवार होणाऱ्या ‘रेल्वे रोको’च्या घटना रोखण्यासाठी रेल्वेनं ही कल्पना अाणली असावी. ‘रेल्वे रोको’त पकडलेल्या नोकरदारांच्या कार्यालयात संपर्क साधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे देणार असल्याचे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सागितलं. 

Loading Comments