शनिवारी मुंबईत धावली एसी लोकल

 Mumbai
शनिवारी मुंबईत धावली एसी लोकल

मुंबई - एसी लोकलला आता पावसाळ्याचा मुहुर्त सापडणार आहे. कुर्ला कारशेडमध्ये वर्षभरापूर्वी चाचणीसाठी आणण्यात आलेल्या लोकलला अखेर मुहुर्त सापडला आहे. शनिवारी पहिल्यांदाच एसी लोकल रुळावरुन धावली आहे. एसी लोकलची चाचणी ठाणे ते टिटवाळा या मार्गावर शनिवारी घेण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना आता लवकरच थंडगार एसीचा प्रवास अनुभवता येणार आहे. 12 डब्ब्यांची 54 कोटी रुपये किमतीची एसी लोकल दहा वर्षांपूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे येत असलेले अडथळे आणि जास्त उंची यामुळे ही लोकल कारशेडमध्येच उभी राहिली. सुरुवातीला पश्चिम रेल्वेवर ही एसी लोकल धावणार होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने या लोकलला मध्य रेल्वेमार्गावर आणण्याचा निर्णय घेतला. मात्र आता पुन्हा या निर्णयात बदल करून ती पश्चिम रेल्वेवरच धावेल, असे सांगण्यात येत आहे.

Loading Comments