Advertisement

पश्चिम रेल्वेवर बसवणार 2800 सीसीटीव्ही


पश्चिम रेल्वेवर बसवणार 2800 सीसीटीव्ही
SHARES

दिवसेंदिवस प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांची सुरक्षा या दृष्टीकोनातून पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर एकूण 2800 सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही कारणास्तव हा प्रस्ताव रखडला होता. पण, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आता या प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेऊन हा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावावा, असे आदेश रेल्वे बोर्ड अधिकारी आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. हा प्रस्ताव रेल्वे प्रवाशांसाठी फार महत्त्वाचा असून सीसीटीव्ही बसवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


विरारपुढील स्थानकांना होणार लाभ

चर्चगेट ते विरापर्यंतच्या सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही आहेत. पण, विरारपुढील वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, बोईसर, वाणगाव, डहाणू रोड स्थानकांत सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना रेल्वे सुरक्षा दलाला मोठी कसरत करावी लागते. हे पाहता विरारपुढील सात स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. 2800 सीसीटीव्हींमधूनच या स्थानकांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.



हेही वाचा

पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण, सीसीटीव्हीने केली पोलखोल


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा