Advertisement

ट्रेनमध्ये प्रवास करताना मास्क घाला, रेल्वे मंत्रालयाचा प्रवाशांना सल्ला

रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत पत्रक जारी करत ही माहिती देण्यात आली आहे.

ट्रेनमध्ये प्रवास करताना मास्क घाला, रेल्वे मंत्रालयाचा प्रवाशांना सल्ला
SHARES

रेल्वेचा प्रवास करताना मास्क घालण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीनं प्रवाशांना करण्यात आलं आहे. मात्र रेल्वे प्रवास करताना मास्कची सक्ती नाही हेही रेल्वेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रालयानं याबाबत एक परिपत्रक काढत ही माहिती दिली.

भारतातील कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना ही घोषणा करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर COVID-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे.

पत्रकात नमूद केलं आहे की, कोरोनाचा धोका लक्षात घेता प्रवाशांनी मास्कचा वापर करावा. पण ही मास्क सक्ती नाही. दिल्लीसारख्या काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्या राज्यामध्ये मास्कची सक्तीही करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत त्या राज्यांमध्ये प्रवास करताना मास्कचा वापर करावं.

प्रवास करताना जर एखाद्याने मास्क वापरला नाही तर त्याचा दंड लागणार नाही, पण तरीही प्रवाशांनी मास्कचा वापर करावा असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येतंय.

मार्चमध्ये, गृह मंत्रालयाने कोरोनाव्हायरस रोगासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी रद्द केल्या. स्थितीतील सर्वांगीण विकास आणि कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सरकारची तयारी लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाय सुचवण्यात आले.

तथापि, आरोग्य मंत्रालयाने सल्ला दिला होता की फेस मास्कचा वापर यासारख्या काही कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाय लागू राहतील.

या घोषणेनंतर, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोविड-19 च्या नियंत्रणासाठी लागू केलेले सर्व निर्बंध मागे घेतले. यासह, मास्क घालणे इच्छिक असल्याचंही म्हटलं.

दरम्यान, मुंबईतही हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत जवळपास 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असं असलं तरी, रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही.



हेही वाचा

पालघरमध्ये सॅटेलाईट विमानतळ उभारणार

मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा