Advertisement

है तैयार हम!


SHARES

मुंबई - रेल्वे रुळावर गेल्या काही दिवसांपासून लोखंडी रॉड ठेवणे, रूळाला तडे जाणे, छतावर प्रवास करताना शॉक लागून प्रवाशांचा मृत्यू ओढवणे यासारख्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. हे लक्षात घेऊन भविष्यात अशा प्रकारांवर आळा बसावा आणि मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून रेल्वे पोलीस सतर्क झाले आहेत. यासाठी रेल्वे पोलिसांनी प्रशिक्षण देण्यासही सुरूवात केली आहे. याचाच प्रत्यय बुधवारी बोरीवली स्थानकावर पाहायला मिळाला. बोरीवलीमध्ये मॉकड्रील करत रेल्वे पोलिसांनी परिसराचा आढावा घेतला. तसेच अशावेळी प्रवाशांनी घाबरू नये, रेल्वे पोलिसांना अशा काळात सहकार्य करावे असंही रेल्वे पोलिसांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा