Advertisement

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीएसएमटीवर 'डीएफएमडी'चं जाळं

सीएसएमटी स्थानकातील प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्थानकावर प्रवेश करण्याच्या आणि स्थानकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर 'डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर'ने (डीएफएमडी) उभारण्याचा निर्णय रेल्वे सुरक्षा बलाने घेतला आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीएसएमटीवर 'डीएफएमडी'चं जाळं
SHARES

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व महत्वाच्या रेल्वे स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसंच, या हल्ल्यानंतर मिळालेल्या अतिदक्षतेच्या सूचनेमुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सीएसएमटी स्थानकातील प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्थानकावर प्रवेश करण्याच्या आणि स्थानकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर 'डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर' (डीएफएमडी) उभारण्याचा निर्णय रेल्वे सुरक्षा बलानं घेतला आहे. त्यामुळं सीएसएमटी स्थानकात प्रवेश करण्यापूर्वीच प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. 


स्वतंत्र मार्ग 

सुरक्षेच्या दृष्टीनं 'डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर' (डीएफएमडी) उभारून प्रवाशांना स्थानकात आत-बाहेर येण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसंच, सीएसएमटी स्थानकातील रेल्वे पोलिस ठाण्यासमोर असलेल्या तिकीट खिडकीनजीक प्रवेशद्वारावर 'डीएफएमडी' उभारण्यात आले आहेत. अशाप्रकारचे ८ 'डीएफएमडी' उभारण्यात आले असून, रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन जवानांना प्रवाशांना सूचना देण्याकरीता नियुक्त केले आहे. 


मर्यादित जागा 

सीएसएमटीच्या लोकल गाड्यांच्या प्लटफॉर्मवरून मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर जाण्याच्या मार्गावर 'डीएफएमडी' उभारण्यात आले होते. परंतु, या 'डीएफएमडीं'मुळं प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी जागा कमी पडत होती. त्यामुळे सीएसएमटी बेस्ट आगाराजवळील स्थानकाच्या प्रवेशद्वारावर 'डीएफएमडी' उभारण्याचं ठरवण्यात आलं आहे.हेही वाचा -

इंजिनीअरिंग परीक्षेचा तिढा सुटला, परीक्षेदरम्यान सुट्ट्या कायम

आता येणार २० रुपयांचं नाणंसंबंधित विषय
Advertisement