Advertisement

बेस्ट संप : एसटी, रेल्वे, मेट्रोकडून जादा फेऱ्या, खासगी वाहनांनाही परवानगी


बेस्ट संप :  एसटी, रेल्वे, मेट्रोकडून जादा फेऱ्या, खासगी वाहनांनाही परवानगी
SHARES

प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळं मुंबईकरांचे चांगलेचं हाल होतं आहेत. बुधवारी संपाचा दुसरा दिवस असून एकही बस धावत नसल्यामुळे ऑफिस, शाळा, कॉलेज गाठणं  अवघड होताना दिसत आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुंबईकरांचं हाल होऊ नये यासाठी एसटी, रेल्वे, मेट्रोतर्फे जादा फेऱ्या चालविण्यात येत आहेत.


संप मिटल्यावर अधिसूचना रद्द

याशिवाय मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहनं यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना बुधवारी गृह विभागामार्फत जारी करण्यात करण्यात आली आहे. नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रस्तावित संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्यात आल्या असून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसंच, संप ज्यावेळी मागे घेतला जाईल त्यावेळी ही अधिसूचना रद्द समजण्यात यावी, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.


एसटीच्या ७६ गाड्या

बेस्ट संपामुळं एसटी महामंडळातर्फे मुंबईसह उपनगरातील विविध मार्गावर गाड्या सोडल्या जात आहेत. त्यानुसार बुधवारी सकाळपासूनच कुर्ला पश्चिम ते बांद्रा -०८ गाड्या, कुर्ला पूर्व ते माहूल - ०८ गाड्या, घाटकोपर ते माहूल ०३ गाड्या, पनवेल ते मंत्रालय - ०५ गाड्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुलाबा - १०, कुर्ला पश्चिम ते सांताक्रूझ – ०५, अंधेरी पुर्व ते स्पेस ०५, दादर ते मंत्रालय - ०५ गाड्या, बोरिवली ते सायन – ०२, ठाणे ते मंत्रालय - १५ गाड्या अशा एकूण ७६ गाड्या एसटीनं सोडल्या आहेत.


रेल्वेच्या विशेष फेऱ्या

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरही विशेष फेऱ्या चालविण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते कल्याण अशा दोन विशेष फेऱ्या चालविण्यात आल्या आहेत. हार्बर मार्गावर वाशी ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते पनवेल अशा दोन तर पश्चिम रेल्वे मार्गावर १२ विशेष फेऱ्या चालविण्यात आल्या आहेत. याशिवाय मेट्रोच्याही १२ विशेष फेऱ्या चालविण्यात आल्या आहेत.



हेही वाचा - 

बेस्ट कर्मचाऱ्यांना मेस्मासह घरं खाली करण्याच्या नोटिसा; संप चिघळला

बेस्ट संप : ५०० गाड्या रस्त्यावर उतरवण्याचा दावा फोल




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा