Advertisement

रेल्वे हद्दीतील झोपड्यांना अच्छे दिन!

रेल्वे हद्दीतील झोपड्यांना अच्छे दिन!
SHARES

मुंबईतील रेल्वेलगतच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी दिली. रेल्वे मंत्रालय आणि एसआरए यांची एक जॉइंट व्हेन्चर कंपनी करुन मुंबईतल्या रेल्वेलगतच्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेकडून तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे मार्गालगतची झोपडपट्टी हटवून रेल्वेचे प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईतल्या मध्ये रेल्वे मार्गावर 37.25 हेक्टर तर पश्चिम मार्गावर तब्बल 41.2 हेक्टर जागेवर झोपड्या वसल्या आहेत. त्यामुळे नवे प्रकल्प राबवताना अडथळे येत होते. ते दूर करण्यासाठी मुंबईत मंगळवारी सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

यासंदर्भात मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली

Decision taken in this meeting for rehabilitation of slum dwellers on the railway land by setting up of JV by GoM & @RailMinIndia ! pic.twitter.com/XPsE7BbI19
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 18, 2017

State housing dept and @RailMinIndia to come together. SRA scheme to be made applicable to help 12 lakh slum dwellers of Mumbai
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 18, 2017

या झोपड्यांसाठी विमानतळावरील झोपड्यांप्रमाणे रेल्वे आणि एसआरए यांचे जॉईंन्ट व्हेन्चर करून पुनर्विकासाची योजना तयार करण्यात यावी, याला तत्वतः मान्याता देण्यात आली. या बाबतचा प्रस्ताव लिखीत स्वरूपात रेल्वेला तात्काळ पाठविण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे हा प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ रेल्वे बोर्डासमोर मंजुरीला ठेवण्यात येईल अशी ग्वाही यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

दरम्यान, या बैठकीत इतर अनेक महत्वपूर्ण निर्णयही घेतले गेले. यामध्ये बेलापूर-सीवूड्स-उरण मार्ग, एमयूटीपी-2 योजनेंतर्गत वांद्रे ते बोरीवली हा मार्ग 2018 पर्यंत पूर्ण करणार असल्याचं प्रभूंनी सांगितलं. तसेच एमयूटीपी-3 आणि यापुढच्या सर्व रेल्वेचे कोच हे एसी आणि दरवाजे हे स्वयंचलित असतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा