जाहिरातबाजीवर करोडोंची उधळपट्टी, प्रवासी सुरक्षा मात्र वाऱ्यावर

मुंबई - रेल्वे. मुंबईची लाईफलाईन. पण याच लाईफलाईनने प्रवास करताना रोज सरासरी 11 प्रवाशांचा मृत्य होतो. त्यावर उपाय योजण्याच्या मोठमोठ्या घोषणाही होतात. मात्र निधीमुळे अनेकदा हात आखडता घेतला जातो. पण उद्घाटनं आणि जाहिरातबाजीसाठी हाच हात मोकळा सोडला जात असल्याची बाब माहिती अधिकारात झालीये. 

रेल्वे मंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आणि राम मंदिर स्टेशनच्या उद्घाटनाच्या शुटींगसाठी लाखो रुपये रेल्वेप्रशासनाने खर्च केलेत. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2004 मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेलाईनच्या दोन्ही बाजूला भिंती उभाराव्या, प्रवाशांसाठी सुरक्षा उपाय करावेत असे आदेश दिले. मात्र निधी अभावी ते सगळे आदेश रेल्वेने बासनात गुंडाळलेत.

Loading Comments