सीएसएमटी-करमाळी तेजस एक्स्प्रेसमध्ये अधिक विस्टाडोम कोचची वाढती मागणी लक्षात घेऊन, रेल्वे अधिकाऱ्यांनी १४ एप्रिलपासून आणखी एक कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन विस्टाडोम कोच, 11 एसी चेअर कार, एक एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि दोन लगेज, जनरेटर कम ब्रेक व्हॅन अशी सुधारित रचना असेल.
CR चे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "दोन्ही गाड्यांच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांच्या तिकिटांची स्थिती तपासण्याची विनंती केली जाते. प्रवाशांना त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी कोविडचे नियम पाळण्याचा सल्ला दिला जातो."