Advertisement

डेक्कन क्वीनचा प्रवास होणार अर्ध्या तासाने कमी

डेक्कन क्वीनने प्रवास करणाऱ्या मुंबई-पुण्याच्या प्रवाशांचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार आहे. डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये नवीन लिंक होमन-बुश (एलएचबी) रेकचा वापर करण्यात येणार आहे.

डेक्कन क्वीनचा प्रवास होणार अर्ध्या तासाने कमी
SHARES

दररोज मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांंसाठी खूशखबर आहे. कारण, आता डेक्कन क्वीनने प्रवास करणाऱ्या मुंबई-पुण्याच्या प्रवाशांचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार आहे. डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये नवीन लिंक होमन-बुश (एलएचबी) रेकचा वापर करण्यात येणार आहे. यामधील 'पुश अँड पुल' या तंत्रज्ञानामुळे दोन्ही प्रवासाचं अंतर ३० ते ३५ मिनिटांनी कमी होणार आहे. तसंच, येत्या काही महिन्यात हे नवीन रेक जोडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


प्रवाशांकरीता फायदेशीर

पुण्याहून मोठ्या प्रमाणात प्रवासी डेक्कन क्वीनने प्रवास करतात. या प्रवाशांमध्ये अनेक जण मुंबईत कामासाठी येत असतात. त्यामुळे त्यांना या नवीन लिंक होमन-बुश (एलएचबी) रेकचा फायदा होणार आहे. सध्या डेक्कन क्वीन पुण्याहून सकाळी ७.१५ वाजता सुटून मुंबई सीएसएमटीला १०.२५ वाजता पोहोचते. तसंच, मुंबईहून संध्याकाळी ५.१० वाजता निघणारी डेक्कन क्वीन पुण्याला रात्री ८.२५ वाजता पोहचते. 


पद्धत वापरणारी दुसरी ट्रेन

पुश अँड पुल टेक्निकमध्ये पुढे आणि मागे असे दोन लोकोमोटीव्ह असतात. त्यामुळे ट्रेनला अधिक स्थिरता मिळते. तसंच, एखाद्या वळणावर वेग कमी-जास्त करण्यात लागणारा वेळ आणि हिसके यामुळे कमी होतात. दरम्यान, सीएसएमटी-निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसनंतर डेक्कन क्वीन ही लिंक होमन-बुश रेक पद्धत वापरणारी मध्य रेल्वेची दुसरी ट्रेन ठरणार आहे. 



हेही वाचा -

परळच्या बेस्ट कामगार वसाहतीची होणार दुरुस्ती

मोनोरेल स्थानकांवर आता सोलार पॅनल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा